Commercial LPG Cylinder Price Today 1 June 2023 : गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठा दिलासा देण्यात आला असून, सिलिंडरच्या वाढत्या किमती तेल कंपन्यांनी कमी केल्यात. मात्र, हा दिलासा सर्वसामान्यांना नसून छोटे दुकानदार आणि हॉटेलमालकांना देण्यात आला आहे. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी जून महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ८३.५० रुपयांची कपात केली आहे. ही कपात केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर १ जूनपासून लागू झाले आहेत.

दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर ८३.५ रुपयांनी स्वस्त झाला असून, तो १७७३ रुपयांवर आला आहे. दुसरीकडे १ मे २०२३ रोजी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ११०३ रुपये होती आणि आजही ती तशी आहे. १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता दिल्लीत १७७३ रुपयांना स्वस्त दरात विकला जात आहे.

Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
DRDO ACEM Nashik Recuritment 2024
DRDO ACEM नाशिकद्वारे अप्रेंटिसच्या पदासाठी होणार भरती! ३० एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या पात्रता निकष
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन

जाणून घ्या कुठे झाला स्वस्त सिलिंडर

कोलकातामध्ये सिलिंडर ८५ रुपयांनी स्वस्त झाला असून, तो आता १९६०.५० रुपयांवरून १८७५.५० रुपयांवर आला आहे.
मुंबईत तो ८३.५० रुपयांनी स्वस्त होऊन १८०८.५ रुपयांवरून १७२५ रुपयांवर झाला आहे.
चेन्नईमध्ये तो ८४.५० रुपयांनी स्वस्त होऊन २०२१.५० रुपयांवरून १९३७ रुपयांवर आला आहे.
आता पाटण्यात १९ किलोच्या निळ्या LPG सिलिंडरची किंमत २०३७ रुपये आहे.
इंदूरमधील व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १८७७ रुपये आहे.

१४.२ किलो घरगुती गॅस सिलिंडरची किंमत किती?

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ११०३ रुपये आहे. कोलकात्यात ११२९ रुपये, मुंबईत ११०२.५ रुपये, चेन्नईमध्ये १११८.५ रुपये, भोपाळमध्ये ११०८.५ रुपये, जयपूरमध्ये ११०६.५ रुपये, इंदूरमध्ये ११३१ रुपये, अहमदाबादमध्ये १११० रुपये आणि लखनऊमध्ये ११४०.५ रुपये आहे.

एलपीजीची किंमत अशा पद्धतीने जाणून घ्या

तुम्हाला एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत तपासायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या https://iocl.com/Products/IndaneGas.aspx वेबसाइटवर जावे लागेल. येथे कंपन्या दर महिन्याला नवीन दर जारी करतात.