पीटीआय, नवी दिल्ली

दिवाळखोरीत निघालेल्या गो फर्स्ट कंपनीच्या पुनरूज्जीवनासाठी दोन कंपन्या बोली लावून पुढे आल्या आहेत. स्पाईसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांच्यासह स्काय वनचे जयदीप मीरचंदांनी ही नावे या संबंधाने प्रामुख्याने घेतली जात आहेत. उल्लेखनीय म्हणजे अजय सिंग प्रवर्तक असलेल्या स्पाईसजेटसमोर मागील दोन वर्षांपासून अनेकांगी आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन, भविष्य निर्वाह निधी आणि उद्गम कर कपात देण्यास कंपनीकडून विलंब लावला जात आहे. खर्चात कपात करण्यासाठी कंपनी मनुष्यबळात १५ टक्के कपात करणार असल्याचे अलिकडेच संकेत दिले आहेत. यापूर्वी सरकारने एअर इंडिया कंपनीतील निर्गुंतवणूक केली त्यावेळीही अजय सिंह यांनी बोली लावली होती. मात्र, एअर इंडिया अखेर टाटा समूहाने सर्वाधिक बोली लावून ताब्यात घेतली. अजय सिंग यांनी व्यक्तिगत रूपात, बिझी बी एअरवेज यांच्यासह संयुक्तपणे बोली लावली असल्याचे स्पष्ट केले आहे.  

Pune cyber crime Five Delivery Boy
दिवसा डिलीव्हरी बॉय, रात्री सायबर क्रिमिनल; कोट्यवधीची फसवणूक करणारे आरोपी जेरबंद
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

नव्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना अजय सिंह म्हणाले की, गो फर्स्ट ही विश्वासार्ह नाममुद्रा असून, या लोकप्रिय प्रवासी विमान कंपनीच्या पुनरूज्जीवनाचा प्रयत्न करताना मला आनंद होत आहे. गो फर्स्टमध्ये मोठी संधी असल्याचा माझा विश्वास आहे. स्पाईसजेटसोबत या कंपनीचे योग्य पद्धतीने पुनरूज्जीवन होईल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फेऱ्या, आंतरराष्ट्रीय वाहतूक हक्क आणि शंभरहून अधिक एअरबस निओ विमानांची मागणी याचाही फायदा दोन्ही प्रवासी विमान कंपन्यांना होईल.

हेही वाचा >>>‘महाबँके’ची डिजिटल नावीन्यतेच्या दिशेने वाटचाल

याबाबत स्काय वनचे अध्यक्ष जयदीप मीरचंदानी म्हणाले की, गो फर्स्टसाठी आम्ही संयुक्तपणे बोली लावली आहे. आता पुढील टप्प्याकडे आमचे लक्ष आहे. जागतिक पातळीवर हवाई वाहतूक क्षेत्राचा आम्हाला मोठा अनुभव आहे. ही कंपनी आमच्या ताब्यात येईल, याबद्दल मला विश्वास आहे. भारतीय हवाई क्षेत्र अभूतपूर्व वाढीच्या उंबरठ्यावर आहे. त्यात भाग घेताना आम्हाला आनंद होत आहे.