पुणे : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने (महाबँकेने) पुण्यात आपला ८९ वा व्यवसाय प्रारंभ दिन नुकताच साजरा केला. बँकेने हाती घेतलेले डिजिटल संक्रमण, डिजिटल परिचालन आणि डिजिटल अनुपालनाच्या क्षेत्रातील परिवर्तनानुसार हा दिवस ‘महापरिवर्तन २.०’ म्हणून साजरा करीत बँकेने नवीन ८९ डिजिटल उत्पादने आणि सेवांचा प्रारंभ केला.

हेही वाचा >>> महागाई नियंत्रणाच्या यत्नांत अनेक आव्हाने – दास

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
Founder and CEO of Cafe Mutual Prem Khatri
बाजारातली माणसं : फंड वितरकांचा हक्काचा माणूस- प्रेम खत्री
Appointment of financial institution
विरार-बोळींजमधील घरांच्या विक्रीसाठी वित्तीय संस्थेची नियुक्ती

या कार्यक्रमाला महाबँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव, बँकेचे कार्यकारी संचालक आशीष पांडे, सरव्यवस्थापक, बँकेचे ग्राहक आणि कर्मचारी उपस्थित होते. बँकेच्या देशभरातील सर्व शाखा आणि कार्यालये आभासी माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले होते. या वेळी ए. एस. राजीव म्हणाले की, आम्ही आपल्या देशसेवेच्या ८९ वर्षांचे पर्व साजरे करीत असताना आमच्यावर ग्राहकांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेला पाठिंबा याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. यापुढे नवकल्पना राबवत आणि अधिक ग्राहककेंद्रित होण्यावर भर देत बँकेच्या वृद्धीच्या नवीन अध्यायाला आम्ही सुरुवात करीत आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि उत्कृष्टतेकडे कायम प्रवास करीत राहण्याच्या संस्कृतीला आत्मसात करून आम्ही व्यक्ती, समुदाय आणि पर्यायाने आपल्या संपूर्ण राष्ट्राला सशक्त करण्याच्या ध्येयाप्रती काम करीत राहू.