Premium

गौतम अदाणी पुन्हा टॉप २० श्रीमंतांच्या यादीत, एका दिवसात कमावले ६.५ अब्ज डॉलर्स

हिंडेनबर्गच्या अदाणी समूहाबद्दलच्या अहवालानंतर कंपनीला मोठा फटका बसला होता. परंतु, त्यातून अदाणी समूह आता सावरला आहे.

gautam adani
गौतम अदाणी यांनी एका दिवसात ५.६ अब्ज डॉलर्सची केली कमाई, निवडणुकीच्या निकालांमुळे शेअर बाजारात विक्रमी वाढ (फोटो क्रेडिट- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारतातले प्रसिद्ध उद्योगपती आणि अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांची संपत्ती वाढली आहे. अदाणी यांनी बुधवारी (२९ नोव्हेंबर) इतकी कमाई केली की ते आता जगातल्या २० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील झाले आहेत. अदाणी समूहाच्या शेअर्सची किंमतही वाढली आहे. त्यामुळे गौतम अदाणी यांच्या नेट वर्थमध्ये ६.५ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार गौतम अदाणी यांची नेट वर्थ आता ६७ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. यासह जगातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत ते आता १९ व्या स्थानावर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अदाणी समूहाच्या शेअर्सच्या मार्केट कॅपमध्ये २८ नोव्हेंबर रोजी मोठी वाढ झाली. त्यांच्या शेअर्सचं मार्केट कॅप १.०४ लाख कोटी रुपयांनी वाढून ११.२९ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. ११ एप्रिल २०२२ नंतर पहिल्यांदाच अदाणी समूहाने एवढी मोठी उडी घेतली आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gautam adani back in worlds 20 richest people list earn 6 5 billion usd in 1 day asc

First published on: 30-11-2023 at 15:15 IST
Next Story
सोन्याच्या भावाची उसळी, सहा महिन्यांतील उच्चांकी पातळी