आशीष ठाकूर

जानेवारी ते मार्च अखेरपर्यंत अमेरिका व आंतरराष्ट्रीय स्तरावर सतत निराशाजनक आणि मनाला उद्विग्न करणाऱ्या घटना आर्थिक आघाडीवर घडत होत्या. त्यात भर म्हणजे आपल्यासारख्या शेतीप्रधान देशाला या वर्षी पावसाची ‘गुगली’ पडणार असे भाकीत करण्यात आले. दरम्यानच्या काळात ‘गेम चेंजर’ घटना घडली व ही एकच घटना ‘तेजीची मुहूर्तमेढ’ रोवण्यास कारणीभूत ठरली ती म्हणजे ६ एप्रिलला रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात कर्जावरील व्याज दर वाढीला विरामाची घटना. तेव्हापासून गुंतवणूकदारांना निफ्टी निर्देशांकाची १९,००० ची स्वप्न या स्तंभातून दाखवली जात होती. ती जूनअखेरीस साकार झाली. त्यात ‘दुग्धशर्करा योगाची भर’ म्हणजे पावसानेदेखील या गुगली बाॅलवर बाद न होता, या गुगली बॉलवर तडाखेबंद बॅटिंग केल्याने निसर्गाच्या प्रसन्न वातावरणात गुंतवणूकदारांच्या हृदयात तेजीचा वसंत फुलताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडयाच्या वाटचालीकडे वळू या.

Riot manipur
अमेरिकेचा भारताबाबतचा अहवाल अत्यंत पक्षपाती; परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून खंडन 
stop manipur violence
‘मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन’, अमेरिकेच्या टिप्पणीनंतर भारताची रोखठोक प्रतिक्रिया
JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…

हेही वाचा >>> निर्देशांकाची अविरत उच्चांकी झेप कायम; नवीन उच्चांकी पातळीला गवसणी

शुक्रवारचा बंद भाव:

सेन्सेक्स:६५,२८०.४५

निफ्टी:१९,३३१.८०

६ एप्रिलच्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात कर्जावरील व्याजदर वाढीला पूर्णविरामाची घटना ही आलेखावर प्रतिबिंबित होत आहे. तेजीची धारणा विकसित होताना दिसत होती. निफ्टीचे अतिशय आकर्षक असे वरचे लक्ष्य प्रतिध्वनीत होत असल्याने, या स्तंभातील एप्रिलपासून लेखांच्या शीर्षकाची जंत्री एकत्र केल्यास ही शीर्षकच ‘शब्दावाचून कळले शब्दाच्या पलीकडले’ अशा धाटणीची होती जसे की, १० एप्रिलच्या लेखाचे शीर्षक होते ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’, ८ मेचा लेख ‘दिवस तुझे फुलायचे’ तर २२ मेच्या लेखाला ‘चांदणे शिंपित जाशी’अशा विविध शीर्षकाखाली तेजीचा लाल गालीचा (रेड कार्पेट) अंथरत असताना, आंतरराष्ट्रीय स्तरावर निराशाजनक आणि मनाला उद्विग्न करणाऱ्या घटना आर्थिक आघाडीवर घडतच होत्या. त्या गृहीत धरत त्यांची व्याप्ती ही निफ्टी निर्देशांकावर ५०० ते १,००० अंशांच्या घसरणीत (धडकी…धडधड) गृहीत धरत, १२ जूनच्या लेखाचे शीर्षक ठेवलेले ‘बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे’ हे हादरे अतिशय मामुली व क्षणिक असतील त्याची चिंता नको त्यासाठी…‘हर फिक्र को धुएँ में उडा’ अशा शीर्षक असलेल्या लेखांची मांडणी केलेली.

हेही वाचा >>> बीएसईकडून शेअर बायबॅकची घोषणा; ८१६ रुपयांच्या दराने शेअर्स खरेदी करणार

२० मार्चच्या निफ्टी निर्देशांकाच्या १६,८२८ च्या नीचांकापासून १९,५०० च्या तेजीच्या प्रवासाचे सिंहावलोकन करता गुंतवणूकदारांच्या मनातील भावना ही ‘हृदयी वसंत फुलतानाच्या’ आहेत.

आता चालू असणाऱ्या घसरणीला निफ्टी निर्देशांकावर १९,०५० हा प्रथम आधार व १८,८५० ते १८,५०० हा द्वितीय आधार असेल. या स्तराचा आधार घेत निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १९,८०० ते २०,१०० असेल.

‘शिंपल्यातील मोती’ सदरातील शिफारस केलेल्या समभागांचा अर्धवार्षिक आढावा

महत्त्वाची सूचना:– आताच्या घडीला शिफारस केलेले सर्व समभाग हे शिफारस केलेल्या किमतीवरच आहेत.‘शिंपल्यातील मोती’ या सदरचा मुख्य उद्देश हा दीर्घमुदतीत संपत्ती निर्माण (वेल्थ क्रिएशन) असल्याने ज्यायोगे निवृत्तीनंतरच नियोजन, गृहकर्ज फेड, मुलांच्या उच्च शिक्षणाची तरतूद म्हणून बघावी. यात एकच पथ्य पाळावे ते म्हणजे, बाजाराचे घातक उतार, कंपनींची आर्थिक कामगिरी हे समभागाच्या बाजार भावावर परावर्तित होत असल्याने गुंतवणूकदारांनी समभाग कितीही आवडता म्हणजेच ‘गुंतता हृदय हे’ या श्रेणीतील असले तरी, समभाग खरेदी किमतीच्या खाली जायला लागल्यास त्वरित समभाग विकून मुद्दल सुरक्षित ठेवावी.        

निकालपूर्व विश्लेषण

१) पीसीबीएल लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- मंगळवार,११ जुलै            

७ जुलैचा बंद भाव- १५९.९० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १५२ रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १५२ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १७५ रुपये, द्वितीय लक्ष्य १९० रुपये.

ब) निराशादायक निकाल : १५२ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १४५ रुपयांपर्यंत घसरण.

२) आनंद राठी वेल्थ लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- बुधवार, १२ जुलै

७ जुलैचा बंद भाव- ९१२.९० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ८८० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ८८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९६० रुपये, द्वितीय लक्ष्य १,००० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ८८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८४० रुपयांपर्यंत घसरण.

३) टीसीएस लिमिटेड.

तिमाही वित्तीय निकाल- बुधवार, १२ जुलै

७ जुलैचा बंद भाव- ३,३२९.२५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ३,२६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ३,२६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ३,३७० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,४५० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ३,२६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,१५० रुपयांपर्यंत घसरण.

४) इन्फोसिस लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार, २० जुलै

७ जुलैचा बंद भाव- १,३३०.२० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- १,२९० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून १,२९० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,३६० रुपये, द्वितीय लक्ष्य १,४४० रुपये.

ब) निराशादायक निकाल :१,२९० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,२०० रुपयांपर्यंत घसरण.

५) पर्सिस्टंट सिस्टिम लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल- गुरुवार, २० जुलै

७ जुलैचा बंद भाव- ४,८२९.५५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- ४,७५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून ४,७५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५,०५० रुपये, द्वितीय लक्ष्य ५,३०० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४,७५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४,५५० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.