भारतातील सर्वाधिक मोठ्या आर्थिक उद्योग समूहाचा अर्थात एचडीएफसी समूहाचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वाधिक व्यवसाय असलेली ‘एचडीएफसी बँक’ आणि खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी गृह वित्त कंपनी ‘एचडीएफसी लिमिटेड’ या दोघांचे विलीनीकरण झाल्यानंतर ‘एचडीएफसी बँके’ने नोंदवलेले हे नफ्याचे पहिले आकडे आहेत.

व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ

वित्त वर्ष २०२३-२४ साठी दुसऱ्या तिमाही मध्ये एचडीएफसी बँकेने १६८११ कोटी रुपये एवढा घसघशीत नफा मिळवला. मागच्या वर्षीच्या १११२५ कोटी रुपयांच्या तुलनेत ही वाढ ५१ टक्के आहे. बाजाराला अपेक्षित असलेल्या आकड्यांपलीकडील हा नफ्याचा आकडा आहे. बँकेच्या व्यवसायाचे आणि नफ्याचे प्रमुख स्त्रोत म्हणजे प्रत्यक्ष कर्जावरील व्याजातून मिळणारे उत्पन्न आणि अन्य मार्गाने मिळणारे उत्पन्न यालाच ‘नेट इंटरेस्ट इन्कम’ असे म्हणतात. एचडीएफसी बँकेचे हेच उत्पन्न या तिमाहीमध्ये २७३८५ कोटी एवढे होते. मागच्या वर्षीच्या ते २१०२१ कोटी रुपये एवढे होते व यामध्ये ३० टक्के वाढ दिसली.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये

प्रति समभाग मूल्य (EPS)

कुठल्याही बँकेसाठी महत्त्वाची आकडेवारी असते ती म्हणजे नफ्यातला नेमका किती हिस्सा गुंतवणूकदारांच्या वाट्याला येणार आहे ? एचडीएफसी बँकेचे अर्निंग पर शेअर या संपलेल्या तिमाहीसाठी २२ रुपये एवढे होते.

वाढलेला ताळेबंदाचा आकार

एचडीएफसी बँकेच्या ताळेबंदाकडे नजर टाकल्यास २२,२७,००० कोटी हा मागच्या वर्षीच्या ताळेबंदाचा आकार होता. त्या तुलनेत या सरलेल्या तिमाहीचा ताळेबंद (बॅलन्स शीट) चा आकार ३४,१६,३१० कोटी रुपये एवढा होता. बँकेसाठी महत्त्वाचे असलेले मुदत ठेवीचे आकडे (Deposits) समाधानकारक राहिले आहेत. बँक लोकांकडून आणि वित्त संस्थांकडून मुदत ठेवींच्या स्वरूपात पैसे स्वीकारते आणि तेच कर्ज म्हणून दुसऱ्यांना देते व या दोन्हीच्या व्याजदरांमधील फरक म्हणजेच बँकेचे उत्पन्न असते. जेवढा फरक अधिक तेवढाच नफा जास्त होतो या तिमाहीमध्ये मुदत ठेवींमध्ये एक लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

एचडीएफसी बँकेचे वाढते नेटवर्क

एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांचे विलीनीकरण झाल्यावर भारतातील सर्व राज्यांमध्ये कंपनीचा व्यवसाय विस्तारला आहे. एकूण ८००० च्या आसपास शाखा आणि २०००० च्या आसपास एटीएम असलेल्या कंपनीचा व्यवसाय फक्त शहरांपुरता मर्यादित न राहता आता निमशहरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा पोहोचला आहे.

हेही वाचा… Money Mantra: विदेशी शेअर्स, गुंतवणूक हितसंबंध प्रकट न केल्यास १० लाखांचा दंड

एकूण शाखांपैकी निम्म्या शाखा निमशहरी आणि ग्रामीण भागामध्ये आहेत. याचबरोबर बँकेने १५३५२ व्यवसाय प्रतिनिधी नियुक्त केलेले आहेत. हे व्यवसाय प्रतिनिधी ‘कॉमन सर्विस सेंटर’ या माध्यमातून कार्यरत आहेत. भविष्यकाळात बँकेचा व्यवसाय वाढवण्याची जबाबदारी याच नव्याने उदयास आलेल्या शाखांवर आहे हे वेगळे सांगायलाच नको.

CASA आणि एचडीएफसी बँक

बँकेच्या दमदार प्रगतीमध्ये व्यावसायिकांनी सुरू केलेले चालू खाते (Current Account) आणि सर्वसामान्य जनतेने सुरू केलेले बचत खाते (Saving Account) यांचा मोलाचा वाटा असतो. बँकेचे खातेधारक जेवढे वाढतील तेवढीच भविष्यात व्यवसाय वाढायची शक्यता असते. या तिमाहीमध्ये एकूण CASA व्यवसायामध्ये दमदार वाढ दिसून आली. बँकेचे कर्जाचे आकडे पाहता व्यावसायिक आणि ग्रामीण भागातील कर्जांनी २९ टक्क्याची वाढ नोंदवली.

अनुत्पादक कर्ज (Non Performing Assets) आणि एचडीएफसी बँक

बँकेसाठी चिंतेचा विषय असलेला आकडा म्हणजे धोकादायक कर्जवाटप; बँकेने कर्जवाटप केलेल्या किती कर्जाची परतफेड सहजपणे शक्य नाही ? याचा आकडा बँकेसाठी महत्त्वाचा असतो. यालाच अनुत्पादक कर्ज किंवा (Non Performing Assets) असे म्हणतात. या तिमाहीअखेर अनुत्पादित कर्जांचे प्रमाण एकूण कर्जांच्या १.३४% इतके कमी होते.

सोमवारी बाजार बंद होताना एचडीएफसी बँकेचा शेअर सहा रुपये घसरण दाखवत १५२९ या किमतीला बंद झाला.