प्रश्न १: एसडब्ल्युपी म्हणजे काय ?

एसडब्ल्युपी ही म्युचुअल फंडाची एक गुंतवणूक स्कीम असून ही एसआयपी अगदी उलट पद्धतीने वापरता येते. या योजनेत एक रकमी गुंतवणूक करून त्यातून एका ठरविक कालावधीने (मासिक/तिमाही/सहामाही वार्षिक) ठरविक रक्कम ठराविक तारखेस काढता येते. सेवा निवृत्तीनंतर नियमित रक्कम मिळण्याच्या दृष्टीने यातील गुंतवणूक बँकेच्या/पोस्टाच्या मासिक व्याज योजनेपेक्षा फायदेशीर ठरू शकते (तथापि आपली गुंतवणूक मार्केट लिंक असल्याने जोखीम असते हे विचारात घेणे आवश्यक असते)

उदाहरणार्थ दरमहाच्या ५ तारखेस आपल्याला २५००० रुपये हवे असतील तर आपण एक रकमी गुंतविलेल्या रकमेतून जेवढे युनिट्स आपल्याला मिळालेले असतील त्यातील त्या महिन्याच्या ५ तारखेला २५००० भागिले सदर युनिटची एनएव्ही एव्हढे युनिट्स विकले जातात व २५००० रुपये आपल्या बँक खात्यात जमा होतात. यामुळे जर मार्केट तेजीत असेल तर आपल्या युनिटची एनएव्ही वाढली असल्याने त्या महिन्याच्या ५ तारखेस २५००० रुपये मिळण्यासाठी कमी युनिट्स विकले जातात आणि जर मार्केट मंदीत असेल तर एनएव्ही कमी असल्याने त्या महिन्याच्या ५ तारखेस २५००० रुपये मिळण्यासाठी जास्त युनिट्स विकले जातात. यामुळे युनिट्सची होणारी विक्री सरासरी पद्धतीने होत असल्याने बऱ्याचदा ५ ते ६ वर्षांच्या कालवधीनंतर नियमित रक्कम घेऊनसुद्धा मूळ गुंतविलेली रक्कम वाढत असल्याचे दिसून येते.

New Tax System, New Tax System Criteria, tax deduction, tax pay, Home Loan tax deduction, Tax Regime, New Tax System, finance article, tax article, marathi finance articles,
करावे कर समाधान : नवीन करप्रणाली निवडण्याचे निकष
The Reserve Bank kept the repo rate steady in its monetary policy meeting for the fiscal year
कर्जदारांचा पुन्हा हिरमोड; व्याजदर कपात नाहीच! रिझर्व्ह बँकेकडून सलग सातव्या बैठकीत ‘जैसे थे’ धोरण
financial year came to an end Be careful when completing transactions
Money Mantra : आर्थिक वर्ष संपत आले; व्यवहार पूर्ण करताना ‘ही’ काळजी घ्या
madhya pradesh high court marathi news, live in relationship marathi news
लिव्ह-इन हे कायद्याने शक्य आहे म्हणजे व्यवहार्य आहेच असे नाही… मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण

हेही वाचा – Money Mantra : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या घोषणेचा तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये फायदा होणार का?

प्रश्न २: याचे एखादे उदाहरण देता येईल का?

समजा राजेश वर्मा नुकतेच खासगी कंपनीतून रिटायर झाले आहेत व त्यांना पीएफ व अन्य पेमेंट मिळून ७५ लाख मिळाले आहेत व त्यांना दरमहा ३०००० हवे असतील तर त्यांना पोस्टात रु. ४९००००० इतकी गुंतवणूक ५ वर्षांसाठी करावी लागेल व ५ वर्षानंतर ४९ लाख परत मिळतील (सध्याचा पोस्टाचा मासिक ठेव योजनेचा ७.४% वार्षिक व्याज दर विचारता घेता) याउलट जर त्यांनी हीच रक्कम म्युचुअल फंडाच्या हायब्रीड योजनेत एसडब्ल्युपी पद्धतीने गुंतवणूक करून दरमह रु.३०००० घेतले तर ५ वर्षानंतर त्यांना सुमारे ५७ ते ५८ लाख परत मिळतील (हायब्रीड फंडाचा सरासरी रिटर्न १०% गृहीत धरून) हायब्रीड फंडात तुलनेने रिस्क कमी असते मात्र पोस्टातील गुंतवणुकीत धोका नसतो.

हेही वाचा – Money Mantra : बाजाररंग – अर्थसंकल्पानंतरचा बाजार

प्रश्न ३ : एसडब्ल्युपी हा पर्याय कोणी निवडावा व काय दक्षता घ्यावी?

सर्वसाधारणपणे सेवानिवृत्त व्यक्तीने या पर्यायाचा विचार नियमित रक्कम मिळेल या उद्देशाने करावा. तसेच अशी गुंतवणूक करताना आपली जोखीम घेण्याची क्षमता विचारात घेऊन त्यानुसार गुंतवणूक करावी. आपल्याला मिळालेली सर्व रक्कम यात गुंतवू नये मात्र काही भाग निश्चितच गुंतवावा असे म्हणता येईल.