देशांतर्गत विविध व्यवस्थापन शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या व्यवस्थापन विषयातील एमबीए अथवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे घेण्यात येणाऱ्या मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट ‘एमएटी फेब्रुवारी २०१६’ या प्रवेश पात्रता परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.

आवश्यक अर्हता- अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.

प्रवेश प्रक्रिया-  अर्हताप्राप्त अर्जदारांची राष्ट्रीय स्तरावर निवड परीक्षा घेण्यात येईल. ही निवड परीक्षा लिखित स्वरूपात निर्धारित परीक्षा केंद्रांवर ७ फेब्रुवारी २०१६ रोजी तर संगणकीय पद्धतीने १३ फेब्रुवारी २०१६ अथवा त्यानंतर घेण्यात येईल.

अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित संस्थेतील अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह भरायचे शुल्क- अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १,२०० रु. संगणकीय पद्धतीने,

नेट-बँकिंगद्वारा अथवा १,२०० रु. चा ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या नावे असणाऱ्या व नवी दिल्ली येथे देय असणाऱ्या डिमांड ड्राफ्टद्वारा करता येईल.

अधिक माहिती- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक तपशिलासाठी संस्थेच्या www.aima.in अथवा http:apps.aima.in/matfeb16 या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची मुदत- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर  २६ जानेवारी २०१६ पर्यंत अर्ज करावेत.