तुमच्या आयुष्याची दीर्घकालीन आणि अल्पकालीन ध्येयं निश्चित करताना तुम्ही स्वत:ला सतत विचारलं पाहिजे की, विविध क्षेत्रात वावरताना मला नेमकं काय करायला सर्वात जास्त आवडतं? उदाहरणार्थ, जर तुमच्या कामाच्या ठिकाणी दिवसभर एकच गोष्ट मी करू शकत असले असते तर ती कुठली गोष्ट असती? जर तुम्ही पैसे न घेता कोणती तरी नोकरी किंवा पूर्णवेळ काम सतत केले असते तर ते कुठले काम असते? कशा प्रकारचे काम तुम्हाला महत्तम आनंद आणि समाधान मिळवून देते?
मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लोने ज्या क्षणी एखाद्या व्यक्तीला सर्वात आनंदी, सर्वात उन्नत आणि सर्वात उल्हसित वाटते त्या वेळेला ‘शिखर अनुभव’ असे म्हटले आहे. तुमच्या आयुष्यातील ध्येयांपैकी एक म्हणजे आयुष्यात शक्य असतील तितक्या शिखर अनुभवांचा आनंद घेणे.
 आजपर्यंतच्या आयुष्यातले तुमचे सर्वाधिक आनंदाचे क्षण कोणते? तुम्ही भविष्यकाळात असे क्षण आणखी कसे मिळवू शकता? तुम्हाला खरोखर काय करायला आवडेल.. हे प्रश्न स्वत:ला विचारत राहा.
‘गोल्स’- ब्रायन ट्रेसी, अनुवाद- गीतांजली गीते, साकेत प्रकाशन, पृष्ठे- २५६, किंमत- २२५.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
lancet study on breast cancer how early diagnosis and understanding relapse can help women
भारतात दर चार मिनिटांनी एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाचे निदान; महिलांकडे दुर्लक्ष होतंय का? वाचा तज्ज्ञांचं निरीक्षण
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र