एम. बी. ए.च्या द्वितीय वर्षांमध्ये घेता येणारे एक स्पेशलायझेशन म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन’ म्हणजेच इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट. आजकालच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये व्यापार व व्यवसाय यांची मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे आणि जीएटीटीसारख्या करारांमुळे देशा-देशातील व्यापाराच्या सीमा केव्हाच इतिहासजमा झाल्या आहेत. या परिस्थितीमुळे एखादी कंपनी अथवा तिचे उत्पादन एका देशात, तर कच्च्या मालाची खरेदी दुसऱ्या देशात आणि मार्केटिंग संपूर्ण जगात या प्रकारचे धोरण स्वीकारू शकते. वाढत्या आंतरराष्ट्रीयीकरणामुळे विविध देशांतील तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होते आणि त्यामुळे वस्तू आणि सेवा यांचा दर्जा सुधारतो. मात्र या सर्व कार्यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच निर्णय घेणे, नियोजन करणे, निर्णयांची अंमलबजावणी करणे इ. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी कुशल व्यवस्थापकांची गरज भासते आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन या स्पेशलायझेशनची निश्चितपणे मदत होते.
या स्पेशलायझेशनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करताना लक्षात घ्यावयाच्या अनेक पैलूंचा अभ्यास करण्याची संधी मिळते. यामध्येही वेगवेगळ्या विषयांचा खोलवर अभ्यास करण्याचा उपयोग होतो. या स्पेशलायझेशनमध्ये सर्वसाधारणपणे समाविष्ट असणाऱ्या काही महत्त्वाच्या विषयासंबंधी विचार करू.
१. आंतरराष्ट्रीय व्यवसाय पर्यावरण- आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करताना, विविध देशांमधील परिस्थिती अभ्यासावी लागते. यामध्ये प्रत्येक देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच कायदाविषयक परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. या सर्व घटकांचा चांगला अथवा प्रतिकूल परिणाम व्यवसायावर होत असतो. उदा. एखाद्या देशामध्ये खुली अर्थव्यवस्था असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर तुलनेने कमी बंधने असतात. तसेच राजकीय परिस्थिती अस्थिर असेल तर व्यवसाय करण्यावर प्रतिकूल परिणाम होतो. याउलट एखाद्या देशात जर राजकीय परिस्थिती स्थिर असेल तर व्यवसाय करण्यास अनुकूल परिस्थिती होते. देशांमधील सामाजिक परिस्थितीसुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम करते. देशामधील धर्म तसेच सामाजिक चालीरीती, संस्कृती या सर्वाचा परिणाम व्यवसायावर होतो. त्याचप्रमाणे देशाची आर्थिक परिस्थिती विचारात घेणे आवश्यक ठरते. आर्थिक परिस्थिती ढासळत असलेल्या देशामध्ये व्यवसाय करण्यास फारशी संधी उपलब्ध नसते.
आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांनी या सर्व बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी वेगवेगळ्या देशांची अर्थव्यवस्था समजून घेतली पाहिजे. जगातील प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थेपासून सुरुवात करून क्रमाने इतर देशांच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला पाहिजे. अर्थव्यवस्थेबरोबरच प्रत्येक देशाची राजकीय, सामाजिक, आर्थिक व कायदेविषयक परिस्थितीचा अभ्यास केल्यास निश्चित फायदा होतो. पुढे व्यवसाय करताना, एखादी वस्तू किंवा सेवा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेताना कशा पद्धतीने न्यायची तसेच वस्तूची जाहिरात कशा पद्धतीने करायची असे महत्त्वाचे निर्णय घेताना या अभ्यासाचा उपयोग होतो. यादृष्टीने हा विषय महत्त्वाचा आहे.
२. आयात-निर्यात व्यापाराची कार्यपद्धती : आपल्या देशामध्ये वस्तूची आयात अगर निर्यात करण्याची एक कार्यपद्धती आहे. त्याचप्रमाणे कस्टमविषयक कायदे आहेत. आयात अगर निर्यात करताना अनेक प्रकारचे दस्तऐवज (डॉक्युमेंटस्) तयार करावे लागतात. या सर्वाची माहिती असणे अत्यावश्यक आहे. आज आयात-निर्यातविषयक कार्यपद्धती व डॉक्युमेंटेशन करून देण्यासाठी अनेक खासगी संस्था असल्या तरीसुद्धा ही माहिती आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापनात करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला असली पाहिजे. याचे कारण असे की, आपण तयार करीत असलेल्या वस्तूला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी असली तरी ही मागणी कशा पद्धतीने पूर्ण करायची हे समजले पाहिजे.
कार्यपद्धती आणि कायदे याबरोबरच देशाचे आयात-निर्यात धोरण काय आहे हेसुद्धा समजायला हवे. यामध्ये निर्यातीला कोणत्या प्रोत्साहन योजना आहेत, तसेच आयातीवर काही र्निबध आहेत का याची माहिती होते.

३. भारतीय अर्थव्यवस्था : इतर देशांच्या अर्थव्यवस्थेबरोबरच आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशी आहे, यावरही आंतरराष्ट्रीय व्यवसाय अवलंबून असतो. अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारत असल्यास आंतरराष्ट्रीय व्यवसायसुद्धा प्रगती करू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर २००८च्या सुमारास आलेल्या मंदीचा फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसला. त्यामधून सावरल्यानंतर पुन्हा गेल्या साधारण वर्षभरात आपली अर्थव्यवस्था ढासळली. वाढती वित्तीय तूट, चलनवाढ, रुपयाचे घसरते मूल्य तसेच आयात-निर्यात व्यापारामधील तूट या सर्व कारणांमुळे मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यवसायावर निश्चितच होतो. उदा. रुपयाच्या घटत्या मूल्यामुळे निर्यात स्वस्त होते तर आयात महाग ठरते. या सर्व आर्थिक परिस्थितीचा अभ्यास, वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी आवश्यक असतो. यासाठी अर्थव्यवस्था, देशाचे अंदाजपत्रक, ढोबळ राष्ट्रीय उत्पादन [ॅ१२२ ऊेी२३्रू ढ१४िू३] या सर्व विषयांचा समावेश यामध्ये होतो.
४. आंतरराष्ट्रीय कायदे : यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या कायद्यांचा समावेश होतो. जागतिक पातळीवर व्यवसाय करताना काही मतभेद झाले किंवा काही कायदेशीर प्रश्न निर्माण झाले तर त्याची सोडवणूक कशी करावी याची कल्पना या विषयातून होते. उदा. पेटंटविषयक प्रश्न निर्माण झाले किंवा ट्रेड मार्कविषयक प्रश्न निर्माण झाले तर त्याविषयी काय कायदे आहेत याची माहिती असायला हवी. तसेच करविषयक कायदे, कामगारविषयक कायदे यांचीही माहिती करून घेणे आवश्यक आहे. जीएएटी तसेच डब्ल्यूटीओ यासारख्या महत्त्वाच्या करारातील तरतुदी काय आहेत, हेसुद्धा समजले पाहिजे.
या विषयांखेरीज, आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन विषय घेऊ इच्छिणाऱ्यांनी, आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय मनुष्यबळ विकास व व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय विपणन (मार्केटिंग), आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी व्यवस्थापन (सप्लाय चेन मॅनेजमेंट) हे विषयसुद्धा अभ्यासण्याची गरज आहे.
वेगवेगळ्या विषयांच्या थिअरीबरोबरच प्रत्यक्ष अनुभव म्हणून कंपन्यांच्या केस स्टडीज घेऊन चर्चा करणे
अतिशय आवश्यक ठरते. याचबरोबर प्रत्यक्ष कंपन्यांना भेटी, अधिकाऱ्यांबरोबर चर्चा, अभ्यासाव्यतिरिक्त वाचन, उदा. कंपन्यांचे वार्षिक अहवाल, कंपन्यांच्या यशामागची कारणे तसेच अपयशामागचीही कारणे इ. विविध
मार्गाचा वापर केल्यास करिअरचा विकास होणे अवघड नाही.    ल्ल
ल्ले५ीूँ’ी‘ं१@८ंँ.ू.्रल्ल

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी
apec climate center predict india will receive above normal monsoon rainfall
विश्लेषण : ला-निनामुळे यंदाच्या पावसाळयात ‘आबादाणी’ होईल?
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर