News Flash

कर्मचारी निवड आयोगाची हिंदी भाषांतरकार निवड परीक्षा

कर्मचारी निवड आयोगातर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषांतरकार व हिंदी प्राध्यापक निवड परीक्षा- २०१४ साठी पात्रताधारक उमेदवारांकडून खाली नमूद केल्यानुसार अर्ज मागविण्यात येत आहेत.

| April 14, 2014 01:03 am

कर्मचारी निवड आयोगातर्फे राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या हिंदी भाषांतरकार व हिंदी प्राध्यापक निवड परीक्षा- २०१४ साठी पात्रताधारक उमेदवारांकडून खाली नमूद केल्यानुसार अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी हिंदी व इंग्रजी या विषयांसह पदवी व पदव्युत्तर पात्रता (यापैकी एका विषयातील पदव्युत्तर पात्रता) पूर्ण केलेली असावी व त्यांना हिंदीच्या भाषांतर – शैक्षणिक कामाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा : अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांचे वय
३० वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर ८ जून २०१४ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई केंद्राचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याद्वारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व भत्ते : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ९३०० – ३४८०० + ४२०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल. याखेरीज त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व लाभही देय असतील.
अर्जासह भरायचे शुल्क : अर्जासह भरायचे शुल्क म्हणून १०० रु.ची निर्धारित टपालघरांमध्ये उपलब्ध असणारी सेंट्रल रिक्रूटमेंट तिकिटे लावणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना तसेच अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ मार्च २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.ssc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : राज्यातील उमेदवारांनी विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्र आणि रिक्रूटमेंट तिकिटांसह असणारे अर्ज क्षेत्रीय निदेशक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई-४०० ०२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०१४.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 1:03 am

Web Title: staff selection commissions exam of hindi interpreter
Next Stories
1 राष्ट्रीय पुरातत्त्व विभागात पुरातत्त्व साहाय्यकांच्या १५ जागा
2 आयुष्याची घडी बसवणारी इस्त्री
3 फॅशनच्या दुनियेतील प्रवेश
Just Now!
X