प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

कोलंबिया विद्यापीठ

AMU gets its first woman VC Naima Khatoon
व्यक्तिवेध : नईमा खातून
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Love Jihad, pune, Pune University
‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा

विद्यापीठाची ओळख- न्यूयॉर्क शहरामध्ये वसलेले कोलंबिया विद्यापीठ हे अमेरिकेतील एक महत्त्वाचे विद्यापीठ आहे. जागतिक दर्जाचे कोलंबिया विद्यापीठ आयव्ही लीग विद्यापीठांपैकी एक आहे. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार जागतिक क्रमवारीत या विद्यापीठाचा सोळावा क्रमांक आहे. या विद्यापीठाची स्थापना इसवी सन १७५४ साली झालेली आहे. ब्रिटनचे राजा जॉर्ज दुसरे यांच्या रॉयल चार्टरनुसार किंग्ज कॉलेज या संस्थेची स्थापना झाली होती. नंतर त्याचे नामांतर कोलंबिया विद्यापीठ असे करण्यात आले. कोलंबिया विद्यापीठ हे अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे जुने विद्यापीठ आहे. कोलंबिया विद्यापीठ हे खासगी संशोधन विद्यापीठ आहे. कोलंबिया विद्यापीठ जवळपास तीनशे एकरच्या कॅम्पसमध्ये पसरलेले आहे. सध्या येथे चार हजार प्राध्यापक-संशोधक आपले अध्यापन-संशोधनाचे कार्य करत असून जवळपास तीस हजार पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करत आहेत.

अभ्यासक्रम- कोलंबिया विद्यापीठातील पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचे असून पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आहेत. विद्यापीठामध्ये एकूण वीस प्रमुख विभाग (स्कूल्स) कार्यरत आहेत. यामध्ये कोलंबिया कॉलेज, द फू फाऊंडेशन स्कूल ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड अ‍ॅप्लाइड सायन्सेस, स्कूल ऑफ जनरल स्टडीज, कोलंबिया लॉ स्कूल, कोलंबिया कॉलेज ऑफ फिजिशियन्स अ‍ॅण्ड सर्जन्स, कॉलेज ऑफ डेंटल मेडिसिन, कोलंबिया जर्नलिझम स्कूल, कोलंबिया बिझनेस स्कूल, नर्सिग, सोशल स्कूल इत्यादी प्रमुख स्कूल्सचा समावेश आहे. विद्यापीठातील या स्कूल्सच्या अंतर्गत एकूण ११५ पदवी, पदव्युत्तर व संशोधन विभाग चालतात. कोलंबियामधील या स्कूल्सच्या माध्यमातून, विद्यापीठ सर्व मेजर्स आणि मायनर्स म्हणजेच पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रम चालवते. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी वा संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. विद्यापीठामार्फत चालणाऱ्या या सर्व अभ्यासक्रमांना त्या-त्या क्षेत्रातील विविध संस्थांची मान्यता मिळालेली आहे. विद्यापीठातील ऑफलाइन अभ्यासक्रम हे फॉल आणि िस्प्रग या दोन सत्रांमध्ये चालतात तर ऑनलाइन अभ्यासक्रम वर्षभर उपलब्ध असतात. विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी त्या-त्या पदवी वा पदव्युत्तर स्तरासाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे आहे.

सुविधा – कोलंबिया विद्यापीठातील शिक्षण जरी अतिशय महाग असले तरी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक कर्ज, निवास व भोजन आदी सुविधा पात्रतेच्या निकषांनुसार दिलेल्या आहेत. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या आवारात विवाहित व अविवाहित विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा बहाल करण्यात येते. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासाठी असलेली अर्जप्रक्रिया व इतर बाबींबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. कोलंबिया एक महत्त्वाची आयव्ही लीग संस्था असल्याने पदवीच्या चार वर्षांच्या कालावधीदरम्यान सर्व पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासाच्या सोयीची हमी विद्यापीठाकडून दिली जाते. विद्यापीठाशी संलग्न काही निवासी महाविद्यालये असून ती विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरणाबरोबरच उत्कृष्ट सामाजिक व सांस्कृतिक वातावरण प्रदान करतात.

वैशिष्टय़ – कोलंबियाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक ऑस्कर व पुलित्झर पुरस्कार विजेते, नोबेल विजेत्यांपासून ते अनेक देशांचे पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष इत्यादींचा समावेश आहे. यामध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, थिओडोर रुज्वेल्ट आणि एफ. डी. रुज्वेल्ट हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होत. याशिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गुंतवणूकतज्ज्ञ वॉरेन बफेट, शास्त्रज्ञ रोबर्ट मिलीकन, सिटी ग्रुपचे विक्रम पंडित, जागतिक अर्थतज्ज्ञ मिल्टन फ्रीडमन यासारखे नामवंत या विद्यापीठामध्ये कधी काळी शिक्षण घेत होते. २०१८ पर्यंतच्या सांख्यिकीनुसार, आतापर्यंतचे एकूण ९६ नोबेल पारितोषिक विजेते, अकरा ऑलिम्पिक मेडलिस्ट्स, १२५ पुलित्झर पुरस्कार विजेते हे या विद्यापीठाचे विद्यार्थी वा प्राध्यापक होते/ आहेत.

संकेतस्थळ –  https://www.columbia.edu/