सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अ‍ॅण्ड पॉवर, गुरुग्राम येथे उपलब्ध खालील विशेष अभ्यासक्रमांचे प्रवेश उपलब्ध आहेत.

थर्मल पॉवर प्लॅण्ट इंजिनीअरिंगमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम – एक वर्ष कालावधीच्या या अभ्यासक्रमासाठी अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इंस्ट्रमेंटेशन, कॉम्प्युटर व इन्फरमेशन टेक्नॉलॉजी यांसारख्या विषयातील इंजिनिअरिंग पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.

इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल सिस्टीममधील पदविका अभ्यासक्रम – सहा महिने कालावधीच्या या विशेष अभ्यासक्रमासाठी अर्जदारांनी इलेक्ट्रिकल अथवा इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्समधील पदविका अभ्यासक्रम चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा- अर्जदारांचे वय २७ वर्षांहून अधिक नसावे.

निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची त्यांची दहावी, बारावी व संबंधित विषयातील पदवी व पदविका अभ्यासक्रमातील गुणांच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.

विशेष सूचना – वरील दोन्ही अभ्यासक्रमांचा प्रारंभ ११ सप्टेंबर २०१७ रोजी होईल. जे विद्यार्थी उमेदवार संबंधित पदवी वा पदविका अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसले असतील तेसुद्धा या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करू शकतात.

अर्जासह पाठवायचे शुल्क – अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून अर्जदारांनी ४०० रु.चा ‘सीबीआयपी, नवी दिल्ली’च्या नावे असणारा व नवी दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट प्रवेश शुल्क म्हणून अर्जासह पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अ‍ॅण्ड पॉवरची जाहिरात पाहावी अथवा बोर्डाच्या www.cbip.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- संपूर्ण भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे प्रवेश अर्ज डायरेक्टर, सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अ‍ॅण्ड पॉवर, सेंटर ऑफ एक्सलन्स प्लॉट नं. २१, सेक्टर ३२, गुडगाव (गुरुग्राम) १२२००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०१७ आहे.

 

नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटमधील पदवी

नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बंगलोर येथे उपलब्ध असणाऱ्या ट्रान्समिशन अ‍ॅण्ड डिस्ट्रिब्युशन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.

जागांची संख्या – अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या ६० असून यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स अथवा पॉवर इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.

निवड पद्धती- उमेदवारांच्या पदवी परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.

अर्जासह पाठवायचे शुल्क- प्रवेश अर्जासह पाठवायचे प्रवेश शुल्क म्हणून अर्जदारांनी ५०० रु.चा ‘पीएसटीआय बंगलोर’च्या नावाने असणारा व बंगलोर येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, बंगलोरची जाहिरात पाहावी. दूरध्वनी क्र. ०८० २६७१३७५८वर संपर्क साधावा अथवा एनपीटीआय- बंगलोरच्या http://www.nptibangalore.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज प्रिन्सिपल डायरेक्टर, नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, सुब्रमण्यमपुरा रोड, बनशंकरी २ स्टेज, बंगलोर- ५६००७० या पत्त्यावर २८ ऑगस्ट २०१७ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

ज्या पदवीधर इंजिनीअर विद्यार्थ्यांना विद्युत वितरण- पारेषण यासारख्या क्षेत्रात पदव्युत्तर पदविकेसह करिअर करायचे असेल अशांसाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर ठरू शकतो.