इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, पुणे येथे पीएच.डी. (केमिस्ट्री/अर्थ क्लायमेट सायन्स) साठी प्रवेश.

पीएच.डी. (अर्थ अँड क्लायमेट सायन्स) – पात्रता – जीओलॉजी/अप्लाईड ओलॉजी/जीओफिजिक्स/फिजिक्स/मॅथेमॅटिक्स/क्लायमेट सायन्समधील कोणतीही शाखा यामधील पदव्युत्तर पदवी.

पात्रता परीक्षेत किमान सरासरी ६०%  गुणांची अट (सीजीपीए – ६/१०) (अजा/अज साठी ५५% गुण.)

शिवाय उमेदवार पुढील परीक्षा उत्तीर्ण असावा –

(१) सीएसआयआर – यूजीसी नेट,

(२) आयएनएसपीआयआर ई-पीएच.डी. फेलोशिप,

(३) जेईएसटी किंवा

(४) गेट.

ऑनलाइन अर्ज http://www.iiserpune.ac.in/admissions/phd-programme वर  दि. १० नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.

पश्चिम रेल्वे, डीआरएम ऑफिस, मुंबई सेंट्रल (नोटिफिकेशन दि. १० ऑक्टोबर, २०१७) वेस्टर्न रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये अ‍ॅप्रेंटिस ट्रेनी पदांची भरती.

(एकूण पदे ५९२) इलेक्ट्रिकल – ईएमयू कारशेड (१९७ पदे), इलेक्ट्रिकल – टीआरएस/बीएल (७३ पदे), इलेक्ट्रिकल – कोचिंग पॉवर (१७० पदे) आणि मेकॅनिकल (१५२ पदे), ट्रेड – फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, वायरमन, पीएएस्एस्ए, मशिनिस्ट इ.

पात्रता – एस्एस्सी (किमान ५०% गुण) आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण.

वयोमर्यादा – दि. १० ऑक्टोबर, २०१७ रोजी १५ ते २४ वष्रे.

निवड पद्धती – एसएससी आणि आयटीआयच्या एकत्रित गुणवत्तेवर आधारित.

विहीत नमुन्यातील अर्ज (www.wr.indianrailways.gov.in वर उपलब्ध) आवश्यक त्या प्रमाणपत्रांसह डिव्हीजनल रेल्वे मॅनेजर (इस्टॅ.) पॉलिसी सेक्शन, डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर ऑफिस, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४००००८ या पत्त्यावर दि. ९ नोव्हेंबर, २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

फी – रु. १००/- (अजा/अज/विकलांग/महिला यांना फी माफ) Sr. DFM-Mumbai Central (W.R.) यांच्या नावे पोस्टल ऑर्डर.

भारतीय रिझव्‍‌र्ह बँक – ६२३ असिस्टंटपदांची भरती.

(मुंबई – एकूण २६४ पदे. अजा – २६, अज – ३१, इमाव – ७८, जन – १२९; नागपूर – एकूण १५ पदे. अज – ४, इमाव – ३, जन – ८) ६२३ पदांमधील महाराष्ट्रात २७९ पदे उपलब्ध आहेत. (मुंबई ऑफिसमधील विकलांगांसाठी एचआय – २ पदे, व्हीआय – ३ पदे, ओएच – ३ पदे आणि माजी सनिकांसाठी ३८ पदे राखीव.)

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किमान सरासरी ५०%  गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज/विकलांग यांना गुणांची अट नाही.)  कॉम्प्युटरवर वर्ड प्रोसेसिंगचे ज्ञान.

वयोमर्यादा – दि. १ ऑक्टोबर, २०१७ रोजी २० ते २८ वष्रे. (उमेदवाराचा जन्म २ ऑक्टोबर, १९८९ ते १ ऑक्टोबर, १९९७ दरम्यानचा असावा.) (अजा/अज – ३३ वष्रेपर्यंत, इमाव – ३१ वष्रेपर्यंत, विकलांग – ३८/४१/४३ वष्रेपर्यंत, परित्यक्ता/विधवा महिला – ३८ वष्रेपर्यंत.)

निवड पद्धती – पूर्व परीक्षा १०० गुणांसाठी (इंग्लिश लँग्वेज ३० प्रश्न, न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी – ३५ प्रश्न, रिझिनग अ‍ॅबिलिटी – ३५ प्रश्न प्रत्येक प्रश्नाला १ गुण. कालावधी १ तास.)

मुख्य परीक्षा – रिझिनग (३० मिनिटे), इंग्लिश लँग्वेज (३० मिनिटे), न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी (३० मिनिटे), जनरल अवेअरनेस (२५ मिनिटे), कॉम्प्युटर नॉलेज (२० मिनिटे) प्रत्येकी ४० प्रश्न, एकूण २०० प्रश्न २०० गुणांसाठी. दोन्ही परीक्षा ऑनलाईन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील.

लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट – मुख्य परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांना ऑफिशियल/लोकल लँग्वेजमधून द्यावी लागेल (महाराष्ट्रासाठी मराठी भाषेतून.) अंतिम निवड मुख्य परीक्षा आणि लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट यातील कामगिरीवर आधारित. अजा/अज/इमाव/विकलांग उमेदवारांना आरबीआयमार्फत परीक्षापूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी आरबीआयच्या रिजनल ऑफिसकडे अर्ज करणे आवश्यक.

परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पणजी इ. वेतन – दरमहा रु. ३२,५२८/-. फी – रु. ४५०/- (अजा/अज/विकलांग/माजी सैनिक यांना रु. ५०/-).

पूर्व परीक्षेचा दि. २७ आणि २८ नोव्हेंबर, २०१७. मुख्य परीक्षा दि. २० डिसेंबर, २०१७ रोजी होईल.

ऑनलाइन अर्ज www.rbi.org.in या संकेतस्थळावर दि. १० नोव्हेंबर, २०१७ पर्यंत करावेत.