महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग व गृह विभागांतर्गत साहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा २०१७ या स्पर्धा निवड परीक्षेअंतर्गत खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत.

जागांची संख्या व तपशील- वरील निवड स्पर्धा परीक्षेअंतर्गत उपलब्ध जागांची संख्या १००८ असून त्याचा पदनिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.

सामान्य प्रशासन विभाग- साहाय्यक कक्ष अधिकारी, गट ब (अराजपत्रित)- उपलब्ध जागांची संख्या १०४. यापैकी १२ जागा अनुसूचित जातीच्या, ७ जागा अनुसूचित जमातीच्या, ७ जागा विमुक्त जातीच्या, ८ जागा भटक्या जमातीच्या, १६ जागा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी व ३ जागा विशेष मागास प्रवर्गासाठी राखीव असून ५४ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.

वित्त विभाग- विक्रीकर निरीक्षक, गट ब (अराजपत्रित)- उपलब्ध जागांची संख्या २५१. यापैकी २६ जागा अनुसूचित जातीच्या, १३ जागा अनुसूचित जमातीच्या, ९ जागा विमुक्त जातीच्या, १५ जागा भटक्या जमातीच्या, ४४ जागा इतर मागासवर्गीय तर ५ जागा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव असून १३९ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.

गृह विभाग- पोलीस उपनिरीक्षक, गट ब (अराजपत्रित)- उपलब्ध जागांची संख्या ६५०. यापैकी ५५ जागा अनुसूचित जातीच्या, ४६ जागा अनुसूचित जमातीच्या, १ जागा विमुक्त जातीच्या, ४४ जागा भटक्या जमातीच्या, ९६ जागा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी तर १२ जागा विशेष मागास प्रवर्गासाठी राखीव असून ३६६ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.

निवड प्रक्रिया- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लेखी निवड परीक्षा घेण्यात येईल. ही स्पर्धा- निवड परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे साहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा- २०१७ अंतर्गत राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर १६ जुलै २०१७ रोजी घेण्यात येईल.

संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे वेगवेगळ्या पदांच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांसाठी मुख्य निवड परीक्षा स्वतंत्रपणे व खाली नमूद केलेल्या तारखांना घेण्यात येईल.

मुख्य परीक्षा दिनांक

  • सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा १० डिसेंबर २०१७
  • विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा ७ जानेवारी २०१८
  • पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा ५ नोव्हेंबर २०१७

वर नमूद केल्याप्रमाणे संबंधित पदाच्या मुख्य परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची संबंधित पदावर अंतिम निवड करण्यात येईल.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी, दूरध्वनी- ०२२-२२७९५९०० अथवा २२६७०२१० वर संपर्क साधावा अथवा आयोगाच्या https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx संकेतस्थळाला भेट द्यावी.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मे २०१७.