अर्जदारांनी कृषी, लाइफ सायन्स, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, पशु-विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, पत्रकारिता, ग्रामीण विकास, संगणकशास्त्र यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित क्षेत्रात काम करण्याचा एक वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहितीसाठी नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनच्या http://www.nif.org.in/join.us या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरपर्सन, नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन इंडिया, सॅटेलाइट कॉम्प्लेक्स, जोधपूर टेकडा, प्रेमचंदनगर, वस्त्रपूर, अहमदाबाद- ३८००१५. या पत्त्यावर १० जून २०१४ पर्यंत पाठवावेत.
ग्रे आयर्न फाऊंड्री, जबलपूर येथे कुशल कामगारांच्या २१० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्यांनी सीएनसी ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, फिटर, मशीनिस्ट, मिल राइट पेंटर, टर्नर, वेल्डर यांसारख्या विषयातील राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य पात्रता पूर्ण केलेली असावी.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ ते ३० मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ग्रे आयर्न फाऊंड्री, जबलपूरची जाहिरात पाहावी अथवा फाऊंड्रीच्या http://www.gifofb.nic.in किंवा http://www.ofbindia.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०१४.
केंद्रीय पुरातत्त्व विभागात रिसर्च असोसिएटस्च्या १५ जागा
अर्जदारांनी प्राचीन भारतीय इतिहास, पुरातत्त्व संस्कृती, सर्वेक्षण यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संगणकाचे अद्ययावत ज्ञान असायला हवे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली भारतीय पुरातत्त्व विभागाची जाहिरात पाहावी अथवा विभागाच्या http://www.asi.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि डायरेक्टर, नॅशनल मिशन ऑन मॉन्युमेंटस अॅण्ड अॅन्टिसिटीज, आर्कियॉलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडिया, जीई बिल्िंडग, लाल किल्ला परिसर, लाल किल्ला, दिल्ली-११०००६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० जून २०१४.
आयुध निर्माणी- जबलपूर येथे प्रशिक्षार्थी अभियंत्यांच्या १६ जागा
उमेदवार केमिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल वा मेटॅलर्जीकल इंजिनीअिरगमधील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावेत तसेच ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ ते ३० मे २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी जबलपूरची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, खमारिया, जबलपूर (मप्र)- ४८२००५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ११ जून २०१४.
विमान वाहतूक मंत्रालयात सहाय्यक संचालकांच्या ४४ जागा
उमेदवारांनी एरोनॉटिकल, इलेक्ट्रॉनिक्स वा इलेक्ट्रिकल इंजिनीअिरगची पदवी अथवा विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ४० वर्षे. अर्जाच्या तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ ते ३० मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची
जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १२ जून २०१४ पर्यंत अर्ज करावेत.
 ‘डीआरडीओ’मध्ये संशोधनपर फेलोशिपच्या ५ जागा
उमेदवारांनी रसायनशास्त्र, पॉलियर्स, तंत्रज्ञान, नॅनो सायन्ससारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी तसेच ‘नेट’ पात्रता परीक्षा दिलेली असावी. पीएच.डी. पात्रताधारक उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाच्या तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ मे २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘डीआरडीओ’ची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, डिफेन्स मटेरियल अॅण्ड स्टोअर्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, ‘डीआरडीओ’, जी.टी.रोड, कानपूर- २०८०१३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ जून २०१४.