|| डॉ. श्रीराम गीत

  • सर मी सध्या बारावी सायन्सला आहे. बीएसएफमध्ये सब इन्स्पेक्टर व्हायचे आहे. त्याची पात्रता व परीक्षा याची माहिती द्याल का? – श्रेयस श्रीराम

श्रेयस प्रथम उत्तम मार्कानी पदवी मिळव. त्या दरम्यान शारीरिक क्षमता वाढवत राहा. केवळ बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच नव्हे तर इतरही सेवांमध्ये तुला संधी मिळू शकते. तुझ्यासाठी युनिफॉर्म सव्‍‌र्हिसेसमधील सबइन्स्पेक्टरचे पद असा शब्द मी सुचवत आहे. सेंट्रल सव्‍‌र्हिसेस, एक्साइज, सेल्स टॅक्स, फॉरेस्ट, पोलीस खाते यापैकी कोणत्याही क्षेत्रात समान संधी (व परीक्षेच्या जवळपास सारख्याच अभ्यासाची) उपलब्ध असतात. सध्याचे तुझे वय अजून वाढीचे आहे. त्यामुळे पदवीपर्यंत उंची व वजन दोन्ही वाढून त्यात भर पडू शकते. पात्रता शारीरिकदृष्टय़ा तयार होत जाते. त्याचा विचार आता नको. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीएसएफमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या एखाद्या सबइन्स्पेक्टरला प्रत्यक्ष भेटून माहिती घ्यावी. त्यानंतर त्यासाठी प्रयत्न सुरू करणे रास्त राहील. आकर्षण व वास्तव यातील फरक जाणून घेणे प्रत्येकच करिअरच्या संदर्भात महत्त्वाचे असते.

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
  • मी दहावीची परीक्षा पास झालो आहे. आता यानंतर इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशनचा डिप्लोमा करत आहे.  मला रेल्वेमध्ये ज्यु. इंजिनीअरच्या पदासाठीची परीक्षा द्यायची आहे. मी खेडय़ामध्ये राहतो.    मी मोबाइलवर अभ्यास करू शकतो काय? अभ्यासक्रम कुठे मिळेल?  – पवार

आपल्या हातातील मोबाइलवरच इंडियन रेल्वे सव्‍‌र्हिसेसच्या ज्युनिअर इंजिनीअरच्या भरतीबद्दलचे संपूर्ण माहितीपत्र वाचायला मिळू शकते. त्यात एकूण पदे, परीक्षेची पद्धत, तारखा, अभ्यास याची समग्र माहिती आहेच.  मुख्य म्हणजे या परीक्षेसाठीची तयारी करणारे व बसणारे अक्षरश: लाखो विद्यार्थी असतात. त्यामध्ये डिप्लोमा, डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएटसुद्धा असतात. डिप्लोमाचा क्रमिक अभ्यासक्रम फर्स्ट क्लासने पास होणे याचा अर्थ आपण तो नीट वाचला आहे एवढाच निघतो. कारण त्या परीक्षेत ९० टक्के वा जास्त मार्क मिळवणारे फक्त महाराष्ट्रात यंदा किमान दोन-तीन हजार विद्यार्थी तरी असतील. तरीही चिकाटीने अभ्यास केल्यास, परीक्षेसाठी आपल्याला सव्विसाव्या वर्षांपर्यंत प्रयत्न करणे सहज शक्य आहे. मात्र फक्त परीक्षेची तयारी करण्यात वेळ न घालवता प्रथम एखादी नोकरी शोधावीत. ती करताना रोज एक ते दोन तास अभ्यास करावा हे मात्र आवर्जून सांगत आहे. त्यासाठी शुभेच्छा.