ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या शैक्षणिक तंत्रविज्ञान विभागाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या संमतीने एम.ए. इन एज्युकेशनल टेक्नॉलॉजी हा दोन वर्षांचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. या पूर्णवेळ अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील पदवीधर मुलींना प्रवेश घेता येईल.
 प्रत्यक्ष कृती, चर्चा, गट-काय्रे, प्रकल्प, सादरीकरण अशा विविध मार्गानी सुयोग्य व पद्धतशीर अध्ययनाचे नियोजन कसे करता येईल याचा सविस्तर विचार व सराव या अभ्यासक्रमात होतो. स्वयं-अध्ययन व गट-अध्ययन करताना वेबवर आधारित संसाधनांची खूपच मदत होते. त्यासाठी शिक्षकांनी कशी तयारी करावी, कोणती कौशल्ये आत्मसात करावीत आणि ‘आयसीटी’चा सुयोग्य वापर कसा करावा याचा या अभ्यासक्रमात सखोल अभ्यास होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विभागात शिकण्यासाठीही अशाच आधुनिक पद्धतींचा आणि माध्यमांचा उपयोग केला जातो.
स्वत: योग्य माहिती शोधण्याचे, एखादे सॉफ्टवेअर अ‍ॅप स्वत: वापरण्याचे, इतरांबरोबर काम करण्याचे, कुशल संवाद साधण्याचे, आत्मविश्वासपूर्वक विषय सादर करण्याचे, सृजनशील निर्मितीचे प्रशिक्षणही मिळते. ई-लर्निग, ऑनलाइन लर्निग, मोबाइल लर्निग, टॅब्लेटचा अध्ययनात वापर, सोशल मीडिया, को-ऑपरेटिव्ह लर्निग, विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, विविध सॉफ्टवेअर अशा अनेक विषयांचा समावेश या अभ्यासक्रमात आहे. या क्षेत्रातील संशोधनांचा आढावा घेऊन एक संशोधन प्रकल्प करण्याची संधीही विद्याíथनींना मिळते. अखेरच्या सत्रात दोन महिन्यांसाठी विद्याíथनींना एखाद्या ई-लर्निग कंपनीमध्ये किंवा नावाजलेल्या शैक्षणिक संस्थेत इन्टर्न म्हणून काम करण्यासाठी पाठवले जाते. या कामाचे विद्यावेतनही मिळते. कित्येकदा परदेशात अशा इंटर्नशिपची संधी दिली जाते. या अभ्यासक्रमानंतर रु. १५ हजार ते २० हजारापर्यंतच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अथवा अधिक माहितीसाठी विभागाच्या ०२२-२६६०२८३१ det.sndt.ac.in या संकेतस्थळावर संपर्क करा.