mpscअभ्यासाच्या दृष्टीने पेपर- ४ ची पारंपरिक अर्थव्यवस्था, गतिमान अर्थव्यवस्था, कृषी आणि विज्ञान व तंत्रज्ञान अशा चार भागांत विभागणी करता येईल. अर्थव्यवस्था हा विषय बहुतांश विद्यार्थ्यांना मोठमोठे आकडे व तांत्रिक संज्ञांचा वापर यामुळे अवघड वाटतो. या विषयाचे समज-गरसमज व न्यूनगंड दूर करून आत्मविश्वासाने या विषयाची तयारी करण्यासाठी अभ्यासाची नेमकी पद्धत पाहू या.
अर्थव्यवस्था हा विषय फक्त आकडेवारीपुरताच मर्यादित नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे. या विषयाचा मूलभूत अभ्यास पक्का असणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. या विषयाच्या संकल्पना फक्त व्याख्या पाठ करून समजून घेता येत नाहीत. म्हणूनच चांगल्या मार्गदर्शकाद्वारे त्या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात किंवा ज्या पुस्तकातून तुम्हाला हा विषय सहजसोप्या पद्धतीने समजून घेता येईल आणि आत्मविश्वासाने तुम्ही या विषयाचा अभ्यास करू शकाल, तेच पुस्तक वापरावे.
एमपीएससीने अभ्यासक्रमात नमूद केलेल्या क्रमानेच या विषयाच्या घटकांचा अभ्यास केल्यास तो परिणामकारक ठरतो. म्हणजे आधी अर्थव्यवस्था समजून घेणे, त्यानंतर योजनांचा  अभ्यास करणे आणि मग विकासाचे अर्थशास्त्र अभ्यासणे असा क्रम ठेवावा.
सर्वप्रथम अर्थव्यवस्था विषयाच्या संकल्पना व संज्ञा व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. या विषयाच्या संकल्पनांचा परस्परांशी घनिष्ठ संबध असतो. त्यामुळे तुलनात्मक  अभ्यासाने हा विषय सोपा होऊ शकतो. उदा. श्रमशक्ती , कार्यशक्ती , श्रमशक्ती सहभाग दर (Labour force participation rate), कार्यसहभाग दर (Work Participation rate) आणि बेरोजगारी दर. या पाच व्याख्या वेगवेगळ्या पाठ करण्याऐवजी त्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास त्या नीट समजतील आणि लक्षातही राहतील. या विषयाच्या तयारीसाठी मूलभूत संकल्पना आणि व्याख्या नीट समजणे ही प्राथमिक अट आहे. या तयारीसाठी  ‘एनसीईआरटी’ची दहावी-बारावीची अर्थव्यवस्थेची पाठय़पुस्तके अभ्यासणे आवश्यक आहे.
दारिद्रय, बेरोजगारी, पायाभूत सुविधा या संकल्पना समजून घेतानाच त्यांचे देशासमोरील समस्यांचे स्वरूप, कारणे, परिणाम आणि संभाव्य उपाय यांचा तक्त्यांच्या स्वरूपात परिपूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे.
पंचवार्षकि योजना हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा पलू आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती साधण्यासाठी शासनाचे प्रयत्न या दृष्टिकोनातून पंचवार्षकि योजनांकडे पाहायला हवे. या योजनांच्या अभ्यासासाठी पुढील मुद्दे लक्षात घ्यायला हवेत-
* योजनेचा कालावधी
* योजनेचे घोषित ध्येय, हेतू व त्याबाबतची पाश्र्वभूमी.
* योजनेचे प्रतिमान, असल्यास घोषणा.
* योजनेतील सामाजिक पलू.
* सुरू करण्यात आलेले उपक्रम, कार्यक्रम, योजना.
* योजना कालावधीत घडलेल्या उल्लेखनीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आíथक महत्त्वाच्या घटना.
* योजनेचे मूल्यमापन व यशापयशाची कारणे, परिणाम.
* योजनेच्या कालावधीत घोषित करण्यात आलेली आíथक, वैज्ञानिक धोरणे.
* योजनेमध्ये विविध क्षेत्रांवर करण्यात आलेल्या खर्चाची, उत्पादनांची टक्केवारी पाहावी.
* भारतातील शहरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, सहकार, उद्योग व कृषीचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व हे चार घटक पारंपरिक व चालू घडामोडी अशा दोन्ही दृष्टिकोनांतून अभ्यासावेत.
उद्योग घटकामध्ये प्रकार, महत्त्व, सद्यस्थान, जागतिकीकरणाचा परिणाम इत्यादी मुद्दय़ांचा संकल्पनात्मक अभ्यास महत्त्वाचा आहे. औद्योगिक धोरणे व विविध पंचवार्षकि योजनांमधील उद्योग क्षेत्राची प्रगती बहुविधानी  प्रश्नांसाठी महत्त्वाची आहे. यामध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ बारकाईने पाहायला हवा.
सहकार क्षेत्राची ब्रिटिश काळापासूनची प्रगती, राज्यातील सहकारी संस्था, त्या क्षेत्रातील सहकाराची कामगिरी, राज्याचे धोरण व सहकाराची समर्पकता हे मुद्दे संकल्पनात्मक प्रश्नांसाठी महत्त्वाचे ठरतात.
पायाभूत सुविधांबाबत तक्ता  करणे श्रेयस्कर ठरते. या तक्त्यामध्ये पुढील मुद्दे असावेत- सुविधेचे असल्यास प्रकार (उदा. ऊर्जेचे प्रकार), उपलब्धता (राष्ट्रीय, राज्य), विकासातील महत्त्व, मागणी/गरज/ वापर, समस्यांचे स्वरूप, कारणे, उपाय, शासकीय धोरणे, शासकीय योजना.
शासकीय योजना त्यांच्या उद्देश आणि विषयानुसार लक्षात घेता येतील. उदा. रोजगारासाठीच्या योजना एकत्रितपणे अभ्यासल्यास त्यांच्यातील साम्य-फरकाचे मुद्दे लक्षात येतात. यामुळे बहुविधानी प्रश्नांची तयारी उत्तम होऊ शकते.

याचबरोबर काही मूलभूत गोष्टींची महाराष्ट्राबाबतची माहिती असणे अथवा अभ्यास असणे गरजेचा आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्टय़े, पंचवार्षकि योजनांमधील महत्त्वाचे मुद्दे, महाराष्ट्रातील कृषीविषयक बाबी, ग्रामीण, नागरी, पायाभूत सुविधा इत्यादी पारंपरिक बाबीसुद्धा अभ्यासणे आवश्यक आहे.
योजनाविषयक तक्त्यामध्ये पुढील मुद्दे असावेत-
* योजना सुरू झाल्याचे वर्ष, असल्यास कायद्याचे नाव.
* कोणत्या पंचवार्षकि योजनेच्या कालावधीत सुरू
* ध्येय, हेतू
* स्वरूप
* खर्चाची विभागणी
* अंमलबजावणी करणारी यंत्रणा
* असल्यास लाभार्थ्यांचे निकष
* कुठल्या योजनेत विलीन झाली असेल तर त्या योजनेचे नाव
* मूल्यमापन
* राजकीय आयाम (कोणत्या सरकारच्या कारकीर्दीत सुरू )

India to remain fastest-growing large economy in FY26, FY27
भारताच्या आर्थिक भक्कमतेबाबत आशावाद; २०२५ मध्ये जागतिक अर्थस्थिती मात्र कमकुवत; प्रमुख जागतिक अर्थतज्ज्ञांच्या या सुसंकेतामागील कारण काय?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमुळे मिळणार २००० कोटींची आर्थिक चालना; अर्थव्यवस्था काय सांगते?
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Central government decision farming Relief
दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या, केंद्र सरकारने २०१४ नंतर पहिल्यांदाच कोणता निर्णय घेतला?
ruhcir sharma
२०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कशी असेल?
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
Story img Loader