प्रश्नवेध एमपीएससी : रोहिणी शहा

लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा सराव प्रश्न

लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा १३ तारखेला होत असून यामध्ये ‘पुरस्कार’ घटकाचा स्वतंत्रपणे उल्लेख करण्यात आला आहे. या घटकाचे सराव प्रश्न या लेखामध्ये देण्यात येत आहेत.

प्रश्न १. सन २०१९च्या पुण्यभूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?

१) आशा भोसले

२) बाबासाहेब पुरंदरे

३) जयंत नारळीकर

४) डॉ. जी. बी. देगलूरकर

 

 प्रश्न २. पुढीलपकी कोणत्या पुरस्कारास ‘प्रति नोबल पुरस्कार’ म्हटले जाते?

१) मॅगसेसे पुरस्कार

२) राईट लाईव्हलीहूड पुरस्कार

३) एबल पुरस्कार

४) गांधी शांतता पुरस्कार

 

प्रश्न ३. ७८वे शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारविजेते व त्यांचे कार्यक्षेत्र यांच्या योग्य जोडय़ा जुळवा.

अ. डॉ. सुबीमल घोष

क . वैद्यकशास्त्र

ब. डॉ. मोहम्मद जावेद अली

कक. अभियांत्रिकी

क. माणिक वर्मा                                ककक. पर्यावरण

ड. डॉ. नीना गुप्ता                               कश्. गणित

१) अ- ३, ब- १, क- २, ड- ४          २) अ- ४, ब- २, क- ३, ड- १

३) अ- १, ब- २, क- ३, ड- ४          ४) अ- ४, ब- ३, क- २, ड- १

 

   प्रश्न ४. दादासाहेब फाळके पुरस्काराबाबत अयोग्य विधान कोणते?

अ. पन्नासावा दादासाहेब फाळके पुरस्कार अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला.

ब. भारतीय चित्रपटांच्या विकासामध्ये योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब दोन्ही

२) केवळ अ

३) केवळ ब

४) अ आणि ब दोन्ही नाही

 

   प्रश्न ५. ‘ग्लोरियस डायस्पोरा – प्राइड ऑफ इंडिया’ या कॉफी टेबल पुस्तकाचा विषय कोणता आहे?

१) यशस्वी अनिवासी भारतीय           २) प्रवासी भारतीय सन्मान विजेते

३) भारतात स्थायिक झालेले यशस्वी परदेशी नागरिक

४) वरील सर्व

 

   प्रश्न ६. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार व त्यांचे निकष यांची अयोग्य जोडी कोणती?

१) राजीव गांधी खेलरत्न – आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग चार वष्रे अत्युत्कृष्ट कामगिरी

२) अर्जुन पुरस्कार – आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग चार वष्रे अत्युत्कृष्ट कामगिरीसहित खिलाडूवृत्ती, नेतृत्वगुण आणि शिस्तीचे प्रदर्शन

३) मौलाना अबुल कलाम आझाद चषक – खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्युत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी साहाय्य करणे

४) ध्यानचंद पुरस्कार – आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक विजेते व निवृत्तीनंतर क्रीडा क्षेत्राच्या विकासामध्ये योगदान

 

    प्रश्न ७. साहित्य अकादमीकडून पुढीलपकी कोणता पुरस्कार दिला / दिले जातो/ जातात?

अ. भाषा सन्मान पुरस्कार

ब. भाषांतरासाठीचा पुरस्कार

क. बाल साहित्य पुरस्कार                 ड. युवा पुरस्कार

पर्यायी उत्तरे

१) वरील सर्व

२) केवळ अ, ब आणि क

३) केवळ ब आणि क

४) केवळ अ, क आणि ड

 

उत्तरे व स्पष्टीकरणे

ल्ल     प्र. क्र.१ . योग्य पर्याय क्र.(४) विज्ञान, कला, संस्कृती, संगीत, समाजसेवा, उद्योग व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुण्यभूषण फाउंडेशनकडून पुण्यभूषण पुरस्कार सन १९८९ पासून दरवर्षी प्रदान करण्यात येतो. या वर्षीचा पुरस्कार पुरातत्व क्षेत्रामधील कामगिरीसाठी डॉ. जी. बी. देगलूरकर यांना प्रदान करण्यात आला.

 

प्र.क्र. २. योग्य पर्याय क्र.(२) जगासमोरील तातडीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी व्यवहार्य व आदर्श उपाय मांडणाऱ्या व्यक्ती / संस्थांना साहाय्य आणि सन्मानित करण्यासाठी स्वीडनच्या राईट लाईव्हलीहूड फाउंडेशनकडून सन १९८०पासून राईट लाईव्हलीहूड पुरस्कार देण्यात येतात. या वर्षीच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती / संस्था पुढीलप्रमाणे-  स्वीडनच्या पर्यावरण कार्यकर्त्यां ग्रेटा थनबर्ग, सहाराच्या मानवी हक्क कार्यकर्त्यां अमिनातू हैदर, चीनच्या महिला हक्क विधिज्ञ गुओ जिआनमी आणि ब्राझीलची हुतूकारा यानोमामी संघटना व तिचे पर्यावरण कार्यकत्रे दावी कोपेनावा यांना जाहीर झाले आहेत.

 

   प्र. क्र. ३. योग्य पर्याय क्र.(१)

या वर्षीचे इतर शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारविजेते पुढीलप्रमाणे –

जीवशास्त्र – डॉ. कायारत साईकृष्णन,

डॉ. सौमेन बसक;

रसायनशास्त्र – डॉ. राघवन बी. सुनोज, डॉ. तपस कुमार माजी;

गणित – डॉ. दिशांत मयूरभाई पांचोली,

डॉ. नीना गुप्ता;

भौतिकशास्त्र – डॉ. अिनदा सिन्हा,

डॉ. शंकर घोष;

वैद्यकशास्त्र- डॉ. धीरज कुमार

भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेकडून शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार सन १९५८पासून देण्यात येतात.

 

    प्र.क्र.४. योग्य पर्याय क्र. (४)

सन १९६९ पासून माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटांच्या विकासामध्ये योगदानासाठीचा भारतातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सुवर्णकमळ, शाल व रु. १० लक्ष असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारतातील पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट – राजा हरिश्चंद्र – दिग्दíशत करणारे दादासाहेब फाळके यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येतो.

 

    प्र. क्र. ५. योग्य पर्याय क्र.(२)

सन २००३ ते २०१९ या कालावधीतील प्रवासी भारतीय सन्मानविजेत्यांची माहिती असणारे हे कॉफी टेबल पुस्तक उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

 

प्र.क्र. ६. योग्य पर्याय क्र.(३) मौलाना अबुल कलाम आझाद चषक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या कामगिरीसाठी विद्यापीठांना प्रदान करण्यात येतो. तर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्युत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी साहाय्य करण्यासाठी द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येतो.

 

प्र.क्र.७. योग्य पर्याय क्र.(१)

या चार पुरस्कारांबरोबरच भारतातील महत्त्वाच्या २४ भाषांमध्ये दरवर्षी साहित्य अकादमी पुरस्कारही देण्यात येतात.