ऑक्सफर्ड  विद्यापीठाच्या उद्योग-व्यवस्थापन विभागात उपलब्ध असलेल्या एमबीए (१+१) अभ्यासक्रमासाठी पìशग  स्क्वेअर  फाऊंडेशनकडून हुशार आणि नेतृत्वगुण असलेल्या विदेशी अर्जदारांना शिष्यवृत्ती दिली जाते. २०१६-१७ साठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संबंधित विषयातील पदवीधर अर्जदारांकडून १८ मार्च  २०१६ पूर्वी अर्ज  मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीविषयी..

जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठ अशी ओळख असलेल्या तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम मानांकन प्राप्त झालेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाची ख्याती सर्वश्रुत आहेच. अद्ययावत  उद्योग- व्यवस्थापन अभ्यासक्रमांचे, जागतिक दर्जाचे प्रशिक्षण  ऑक्सफर्ड  विद्यापीठात उपलब्ध आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम व वेगवेगळे विभाग आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. या विद्यापीठाचा व्यवसाय विभाग सद बिझनेस स्कूल या नावाने ओळखला जातो. सौदी उद्योजक सद वाफिक यांच्या निधीतून हा विभाग १९९६ साली विद्यापीठात सुरू करण्यात आला. या विभागाच्या वतीने पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रम राबवण्यात येतात. या विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या एकूण अभ्यासक्रमांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम अधिक आहेत. त्यातील विविध अभ्यासक्रमांपकी एमबीए (१+१) या आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पìशग स्क्वेअर फाऊंडेशनतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. उद्योग-व्यवस्थापनामधील व्यावसायिक प्रवृत्ती तयार होऊन उद्योग क्षेत्रातील जागतिक दर्जाचे नेतृत्व ऑक्सफर्डमधून घडावे या उदात्त हेतूने पìशग स्क्वेअर फाऊंडेशनने ही शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे.

एमबीए (१+१) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. एमबीए (१+१)  याअंतर्गत अर्जदाराला एक वर्षांत एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल आणि दुसऱ्या वर्षी (विद्यापीठाने दिलेल्या यादीतील) इतर कोणताही अभ्यासक्रम निवडून पूर्ण करावा लागेल. शिष्यवृत्तीधारकाला एमबीए कालावधीपुरतीच शिष्यवृत्ती उपलब्ध असेल. याचाच अर्थ त्याला त्याच्या दुसऱ्या अभ्यासक्रमासाठी आíथक निधीची तरतूद करावी लागेल. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला पìशग स्क्वेअर फाऊंडेशनकडून त्या कालावधीकरता पूर्ण शिकवणी शुल्क दिले जाईल तसेच त्याला शिष्यवृत्ती वेतन मिळेल. विद्यापीठाच्या इतर सुविधा शिष्यवृत्तीधारकाला उपलब्ध असतील. शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर कुणालाही हस्तांतरित करता

येणार नाही.

अर्ज प्रक्रिया

या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा एमबीएचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून दुव्यामध्ये दिलेल्या संस्थेच्या वेबसाइटवर जमा करावा. हा अर्ज भरताना अर्जदाराला एमबीएसोबत आणखी एका पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही अर्ज करावा लागेल. अर्ज जमा करताना अर्जदाराने अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल सविस्तर माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., स्वत:चा सी.व्ही., त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची अथवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी जोडाव्यात. याबरोबरच अर्जदाराने जीआरई, टोफेल किंवा आयईएलटीएस या परीक्षा दिल्या असतील तर अधिकृत संस्थेमार्फत परीक्षांचे गुण विद्यापीठाला कळवावे. याव्यतिरिक्त अर्जदाराला शिष्यवृत्तीसाठी कमाल ५०० शब्दांचा स्वतंत्र निबंध विद्यापीठाला पाठवला लागतो. या वर्षीच्या निबंधाचा विषय आहे. How do you intend to change the world? What does this tell us about you as a person?l

आवश्यक अर्हता

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याकरता अर्जदाराला ऑक्सफर्डमध्ये एमबीए (१+१) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेला असावा. अर्जदार ज्या क्षेत्रात कार्यरत असेल, त्या क्षेत्रातील दांडगा अनुभव व उत्तम नेतृत्वकौशल्ये त्याच्याकडे असावीत. अर्जदाराचे चारित्र्य, अनुभव, कल आणि उद्देश हे जागतिक मुद्दय़ांना स्पर्श करणारे असावेत. अर्जदाराने तसे त्याच्या अनुभवाचे प्रशस्तीपत्र अर्जासोबत जोडावे. अर्जदाराची पदवी (अथवा पदव्युत्तर पदवी) स्तरावरील शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अर्जदाराने आयईएलटीएस या इंग्रजीच्या परीक्षेत उत्तम गुणांकन प्राप्त केलेले असावे.

निवड प्रक्रिया

अर्जदाराची विषयातील गुणवत्ता लक्षात घेऊन व निवड समितीकडून अर्जाची छाननी झाल्यानंतर त्याची मुलाखतीसाठी अंतिम निवड करण्यात येईल. मुलाखतीस पात्र ठरलेल्या अर्जदारांना ८ एप्रिल २०१६ पर्यंत निवड समितीसमोर मुलाखत देण्यासाठी पाचारण केले जाईल. त्यानंतर मग अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत २९ एप्रिल २०१६ पर्यंत कळवले जाईल.

अंतिम मुदत

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ मार्च २०१६ आहे.

महत्त्वाचा दुवा

https://www.sbs.ox.ac.uk

itsprathamesh@gmail.com