BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथे विविध पदांवर उमेदवारांची नोकरीसाठी भरती करण्यात येणार आहे. नेमक्या कोणत्या आणि किती पदांवर भरती करण्यात येणार आहे ते जाणून घ्या. तसेच, नोकरीचा अर्ज पाठविणाऱ्या उमेदवारांनी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया व अर्ज पाठविण्याच्या अंतिम तारखेबद्दल माहिती पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

BECIL Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

स्टार्ट-अप फेलो या पदासाठी एकूण चार रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
यंग प्रोफेशनल या पदासाठी एकूण १० रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.
आयटी सल्लागार या पदासाठी एकूण एका रिक्त जागेवर भरती करण्यात येणार आहे.

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण १५ जागांवर भरती करण्यात येणार आहे.

हेही वाचा : VNIT Nagpur recruitment 2024 : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत नोकरीची संधी! पाहा माहिती

BECIL Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

स्टार्ट-अप फेलो या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची तंत्रज्ञान / इंजिनियरिंग क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे.

यंग प्रोफेशनल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही विषयातील मास्टर्सची पदवी असणे आवश्यक आहे.

आयटी सल्लागार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे –
माहिती तंत्रज्ञान / माहिती विज्ञान / संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स या विषयांमधील बी.ई. किंवा बी.टेक. शिक्षण असावे.
माहिती तंत्रज्ञान / माहिती विज्ञान / संगणक विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स या विषयांमधील पाच वर्षांच्या अनुभवासह डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
UGC/ AICTE/ MCA मान्यताप्राप्त विद्यापीठातून माहिती तंत्रज्ञान / माहिती विज्ञान / संगणक विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्समध्ये एम.ई. / एम.टेक अथवा MBA (IT) शिक्षण असणे आवश्यक आहे.

BECIL Recruitment 2024 : वेतन

स्टार्ट-अप फेलो या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५०,०००/- रुपये वेतन देण्यात येईल.
यंग प्रोफेशनल या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६०,०००/- रुपये वेतन देण्यात येईल.
आयटी सल्लागार या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३३,००० ते ४४,०००/- रुपये दरम्यान वेतन देण्यात येईल.

BECIL Recruitment 2024 – ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड अधिकृत वेबसाईट –
https://www.becil.com/

BECIL Recruitment 2024 – अधिसूचना –
https://www.becil.com/uploads/vacancy/454AICTE17May24pdf-57009e28724fe7fd3cb3a760b316bc37.pdf

BECIL Recruitment 2024 – अर्ज लिंक –
https://becilregistration.in/

BECIL Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील पदांवर नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
नोकरीचा अर्ज भरताना उमेदवारांनी त्यांची संपूर्ण आणि अचूक माहिती अर्जात भरावी.
तसेच, अर्जासह आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडावीत.
अर्ज भरताना उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज शुल्काबद्दलची सविस्तर माहिती ही नोकरीच्या अधिसूचनेत दिलेली आहे.
इच्छुक उमेदवारांनी नोकरीचा अर्ज हा अंतिम तारखेआधी भरायचा आहे.
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ही २९ मे २०२४ अशी आहे.

वरील पदासंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट, अधिसूचना आणि अर्ज करण्याची लिंक ही वर नमूद केलेली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Becil recruitment 2024 broadcast engineering consultants india limited is hiring on various positions check out dha