सुहास पाटील

इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स ( IPR) मध्ये करिअर करावयाचे आहे – अॅकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च (AcSIR) (पार्लमेंट अॅक्ट अंतर्गत स्थापित एक राष्ट्रीय महत्त्वाची संस्था) यांचे कृपाछत्राखाली सीएसआयआर – युनिट फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ इन्फॉरमेशन प्रोडक्ट्स (CSIR- URDIP) द्वारा दिला जाणारा ‘पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन पॅटइन्फॉरमॅटिक्स (Patinformatics) (PGD in ( Patent Informatics))’ साठी प्रवेश. कोर्सचे उद्दिष्ट – उमेदवारांना इंटेलेक्च्वल प्रॉपर्टी राईट्स ( IPR) ची ओळख करून देणे व पेटेंट इन्फॉरमेशनचे रिसर्च आणि बिझनेसमधील महत्त्व समजावून देणे.

व्यवसाय/रोजगाराची संधी – कॉर्पोरेट प्लॅनिंग, बिझनेस डेव्हलपमेंट, आयपी अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट मॅनेजमेंट, लॉ फर्म्स, कन्सलटन्सी कंपनीज आणि इतर नॉलेज प्रोसेसिंग ऑर्गनायझेन्समधील वाढत्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.

कोर्सचा कालावधी – १ वर्षाचा असेल. ज्यात ४ क्वार्टर्समध्ये थिअरी क्लासेसचे १२ मॉड्युल्स, हँड्स ऑन प्रॅक्टिकल सेशन्स, वर्किंग ऑन डेटाबेसेस आणि अॅनालायटिकल टूल्स, डेली असाईन्मेंट्स आणि प्रोजेक्ट्स यांचा समावेश असेल.

हेही वाचा >>> MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – चालू घडामोडी

पात्रता – सायन्स टेक्नॉलॉजीमधील मास्टर्स डिग्री/M.Pharm./ B.E.B.Tech./ LL.B. with Science Background/M.Lib.Sci.with Graduation in Science/MBA with Graduation in Science. (प्रत्येक पदवीला किमान ६० टक्के गुण आवश्यक.) (इमाव/दिव्यांग उमेदवारांसाठी किमान ५५ टक्के गुण व अजा/ अजसाठी ५० टक्के गुण आवश्यक.)

निवड पद्धती – उमेदवारांची निवड पुणे येथे दि. २७ आणि २८ जून २०२४ रोजी इंटरह्यू घेवून केली जाईल. अंतिम निवड यादी दि. १० जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाईल.

प्रवेश क्षमता – एकूण ३० जागा. (कोर्स १२ ऑगस्ट २०२४ पासून सुरू होणार.)

कोर्स फी – संपूर्ण कोर्सची ट्युशन फी रु. ६२,०००/-. जी रु. ३१,०००/- च्या दोन हप्त्यांमध्ये भरता येईल. स्पॉन्सर्ड उमेदवारांना कोर्स फी असेल रु. १,२४,०००/-. AcSIR यांचेकडे फी दि. १९ जुलै २०२४ पर्यंत भरता येईल.

शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी – admission@urdip.res.in

अर्जाचे शुल्क – रु. १,०००/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी रु. ५००/-.)

ऑनलाइन अर्ज https://pgdp.urdip.res.in या संकेतस्थळावर दि. ४ जून २०२४ पर्यंत करावेत.

आवाहन

यूपीएससी द्यायची आहे. तर मनात हजारो प्रश्न उभे राहतात. मार्गदर्शनाची गरज भासते. अर्थात प्रश्न तिथे उत्तरही असतेच, करिअरशी निगडित देशातील सर्वोच्च परीक्षांविषयीच्या शंकांचे निरसन होईल, असे एकच ठिकाण म्हणजे करिअर वृत्तांतमधील करिअर मंत्र. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, लेखणी उचला आणि प्रश्न विचारा. प्रश्न विचारताना आवश्यक तेथे आपली शैक्षणिक, वैयक्तिक माहिती सविस्तर लिहावी. जेणे करून योग्य प्रकारे शंका समाधान होईल.

आमचा ई-पत्ता : careerloksatta@gmail.com