रोहिनी शहा

मागील वर्षीपासून अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सर्व गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गांच्या परीक्षांचा पहिला टप्पा म्हणून सुरू झाली. या व त्यामागील गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षेमध्ये चालू घडामोडी या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे या लेखामध्ये पाहू.

● प्रश्न १. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते (२०१९) अभिजीत बॅनर्जी यांचा आजवरचा जीवनप्रवास पुढील मुद्द्यांमध्ये दिला आहे. त्याची पुनर्जुळणी करून योग्य पर्याय निवडा.

अ. न्यूनतम आय योजना (न्याय) या भारतातील दारिद्र्य, निर्मूलन योजनेच्या निर्मितीत योगदान दिले.

ब. ‘गरिबीचे अर्थशास्त्र’ या ग्रंथाचे लेखन.

क. इन्फोसिस पुरस्कार मिळाला.

ड. प्रेसिडेन्सी कॉलेज, कोलकाता येथून अर्थशास्त्राचे अध्ययन.

पर्यायी उत्तरे :

(१) क, ब, ड, अ(२) ड, ब, अ, क

(३) ड, क, ब, अ(४) क, ब, अ, ड

● प्रश्न २. २०२० मधील लॉकडाऊन दरम्यान कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने कृषी उत्पादनांच्या सुलभ वाहतुकीसाठी ——————————- हे मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले.

(१) किसान एक्सप्रेस(२) किसान रघु

(३) किसान कनेक्ट(४) कृषी नेटवर्क

● प्रश्न ३. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०२१ मध्ये न्यायमूर्ती आर.व्ही. रवीन्द्रन समिती खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी नेमली आहे?

(१) आय.पी.एल. स्पॉट फिक्सींग घोटाळा चौकशी समिती

(२) पेगॅसस प्रकरणासाठी चौकशी समिती

(३) आधार कार्ड धोरण निश्चिती

(४) यापैकी एकही नाही

● प्रश्न ४. अल् मोहद-अल् हिंदी हा पहिला नौदल सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान ऑगस्ट २०२१ मध्ये पार पडला आहे?

(१) भारत – इंराण(२) भारत – ओमान

(३) भारत- अफगाणिस्तान(४) भारत – सौदी अरेबिया

● प्रश्न ५. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनांसंदर्भातील स्थळ, वर्ष व संमेलनाध्यक्ष यांचा योग्य क्रम सांगणारा अचूक पर्याय निवडा.

वर्ष व ठिकाण संमेलनाध्यक्ष

अ.२०१६ – ठाणे I. जयंत सावरकर

ब.२०१७ – उस्मानाबाद II. प्रेमानंद गज्वी

क.२०१८ – मुलुंड III. किर्ती शिलेदार

ड. २०१९ – नागपूर IV. गंगाराम गवाणकर

पर्यायी उत्तरे :

अ ब क ड

(१) III II IV I

(२) II III I IV

(३) IV I III II

(४) I IV II III

● प्रश्न ६. युद्धकाळात गाजविलेल्या असामान्य शौर्याबद्दल २०२१ मध्ये अशोकचक्र हा सन्मान यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

(१) अल्ताफ हुसेन भट्ट(२) ए.एस.आय. बाबू राम

(३) ज्योतीकुमार निराला(४) अश्विनीकुमार दिक्षित

● प्रश्न ७. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

( a) हा कायदा २० जुलै २०२० पासून लागू झाला.

( b) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंध नियमांचा समावेश या कायद्यात करण्यात आला आहे.

( c) ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमानुसार १० लाख रूपयांपर्यंतच्या तक्रारींसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.

पर्यायी उत्तरे :

(१) विधाने ( a) व ( c)(२) विधान ( a)

(३) विधाने ( b) व ( c)(४) विधान ( c)

● प्रश्न८. जीसॅट-३० ची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत ?

अ. वजन ३३५७ kg

ब. उच्च गुणवत्तेची दूरदर्शन, दूरसंचार व प्रसारण सेवा देणार

क. १२ सी, १२ केयू बँड ट्रान्सपोन्डर ने सुसज्ज

ड. उच्च गुणवत्तेचा दळणवळण उपग्रह

पर्यायी उत्तरे :

(१) फक्त अ आणि क(२) फक्त ब आणि ड

(३) फक्त अ, क आणि ड(४) वरीलपैकी सर्व

वरील विश्लेषणाच्या आधारे पुढील मुद्दे लक्षात येतात.

वेगवेगळ्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील पुरस्कारांबाबत किमान एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे.

संरक्षण क्षेत्र, अंतराळ क्षेत्र आणि तंत्रज्ञान याबाबतच्या प्रश्नांचा समावेश दरवर्षी करण्यात आलेला दिसून येतो.

क्रिडा स्पर्धा/ क्रिडा क्षेत्रातील व्यक्तिमत्वे किंवा क्रिडा पुरस्कार यांबाबतही दरवर्षी प्रश्न विचारलेले आहेत.

राज्य स्तरावरील संमेलने आणि व्यक्तिमत्वे यांनाही श्कढ यादीमध्ये ठेवणे आवश्यक आहे.

चालू घडामोडी घटकामध्ये सन २०२३ पर्यंत बहुविधानी प्रश्नही विचारण्यात येत होते. सन २०२४ च्या गट ब आणि क संयुक्त परीक्षेमध्ये सर्व प्रश्न एका वाक्या/शब्दात उत्तरे असलेल्या स्वरुपाचे दिसून येतात. त्याचबरोबर लक्षात घ्यायची बाब म्हणजे सन २०२४ मध्ये तरी चालू घडामोडींवरील प्रश्न हे तथ्यात्मक स्वरुपाचेच होते. खूप जास्त विश्लेषण विचारण्यावर भर दिलेला नाही.

या घटकाची तयारी कशी करावी हे पुढील लेखामध्ये पाहू.

चालू घडामोडी प्रश्न विश्लेषण