Common Mistakes Ruin Your Career : प्रत्येकाच्या आयुष्यात करिअर हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. योग्य करिअर करून भविष्य घडविणे, हे खूप महत्त्वाचे असते. अनेकदा करिअरमध्ये चढउतार येतात पण प्रत्येक समस्येचा सामना करणे, गरजेचे आहे तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयामध्ये यशस्वी होऊ शकता. करिअरच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण एखादी छोटी चूक अनेकदा आपले करिअर खराब करू शकते. चुका या प्रत्येकाकडून होतात पण काही चुका अनेकदा महागात पडू शकतात. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्ही काय बोलता आणि काय करता, याविषयी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आज आपण अशाच काही चुकांविषयी जाणून घेणार आहोत ज्या कोणीही करू नये.

पैशांच्या मागे धावणे

तुम्ही सतत पैशाचा विचार करत असला तरी नेहमी पैशांचे मागे धावू नका. ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आवड आहे ती नोकरी किंवा व्यवसाय करा. तुमच्या व्यावसायिक इच्छा काय आहेत, हे जाणून घ्या. ज्या कामामध्ये तुम्हाला स्वारस्य नाही तिथे पैशाला प्राथमिकता देऊ नका.

स्वत:ला विकू नका

जेव्हा लोक तुम्हाला तुम्ही मिळवलेल्या गोष्टींविषयी विचारतात तेव्हा स्वत:ला कमी समजू नका. तुम्ही स्वत:ला विकू नका. जर समोरचा व्यक्ती तुम्हाला त्यांनी दिलेल्या किंमतीवर संधी देत असेल तर अशावेळी अशी संधी स्वीकारू नका. किंमत कमी जास्त करा, त्याचे विश्लेषण करा आणि नोकरी करावी की नाही, यासाठी तुमचा वेळ घ्या.

हेही वाचा : यूपीएससी सूत्र : पश्चिम बंगालमधील ‘रेमल’ चक्रीवादळ अन् जागतिक आरोग्य संघटनेची साथरोग ठराव बैठक, वाचा सविस्तर…

सर्वच प्रकारचे कौशल्ये शिकण्याची गरज नाही

सर्व प्रकारची कौशल्य शिकणे हे मोठे यश वाटू शकते पण व्यावसायिक जगात हे फार चांगले नाही. तुम्हाला पाहिजे त्या क्षेत्रातच फक्त कौशल्ये वाढवा आणि तज्ज्ञ व्हा ज्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ अधिक चांगला होईल आणि नोकरी देणारे तुम्हाला तुमच्या स्पेशलायझेशनच्या जोरावर नोकरी देऊ शकतात

व्यावसायिक लोकांच्या संपर्कात राहा

नेटवर्किंग हा व्यावसायिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या व्यावसायिकांशी संवाद साधता तेव्हा तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. व्यावसायिक व्यक्तींच्या संपर्कात राहल्यामुळे तुमचे ज्ञान वाढू शकते आणि करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकते.

तुमचे काम आपोआप ओळखले जाईल, असा विचार करू नका

अनेकदा मॅनेजर लोकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केलेले काम लक्षात येत नाही. जर तुम्ही तुमचे काम स्वत:हून दाखवले नाही तर ही मोठी चूक ठरू शकते. अशा वेळी तुमचे सहकारी यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे तुमचे काम आपोआप ओळखले जाईल, असा गैरसमज करू नका.

वैयक्तिक आयुष्याविषयी व्यावसायिक जीवनात चर्चा करू नका

व्यावसायिक आयुष्यात वैयक्तिक जीवनाविषयी बोलणे चुकीचे ठरू शकते. जर तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात समस्या असतील तर तुमच्या कामाच्या ठिकाणी कधीही शेअर करू नये. अनेकदा शेअर केलेल्या गोष्टींचा सहकाऱ्यांकडून गैरफायदा घेतला जाऊ शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)