NLC Recruitment 2024 : एनएलसी इंडिया लिमिटेड ही कंपनी केंद्र शासनाची नवरत्न कंपनी आहे. जर तुम्ही कोणी इच्छुक उमेदवार सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुम्ही येथे अर्ज करू शकता. एनएलसी इंडिया लिमिटेडने विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. तुम्ही २४ एप्रिलपर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या पदांसाठी nlcindia.in अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकता. भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे व पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, अर्ज कसा करावा याबद्दल या लेखातून अधिक माहिती जाणून घेऊ.

कोणत्या पदासाठी किती जागा?

औद्योगिक कामगार – ९, लिपीक सहायक – १७ आणि ज्युनियर इंजिनीयर पदांसाठी – ८ म्हणजेच एकूण ३४ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता –

१. ज्युनिअर इंजिनिअर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इंजिनीअरिंग किंवा डिप्लोमा विषयात संबंधित विद्यापीठाने दिलेली पदवी असावी.

२. औद्योगिक कामगार या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराकडे एखाद्या संस्थेद्वारे प्रदान करण्यात आलेली इंजिनीअरिंग किंवा डिप्लोमाची पदवी असावी.

३. लिपिक सहाय्यक पदासाठी अर्ज उमेदवाराने १२ वी सह आयआयटी पास असणे सुद्धा महत्वाचे आहे.

अर्ज फी –

ज्युनिअर इंजिनिअर – युआर / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी ५९५ रुपये , तर एससी / एसटी / पीडब्ल्यूडी / माजी सैनिक उमेदवारांनी २९५ रुपये अर्ज फी भरायची आहे.

लिपिक सहाय्यक आणि औद्योगिक कामगार – युआर / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारांना ४८६ रुपये तर एससी / एसटी / पीडब्ल्यूडी / माजी सैनिक या उमेदवारांनी २३६ रुपये अर्ज फी भरायची आहे.

हेही वाचा…NVS Recruitment 2024: NVS मध्ये मेगा भरती सुरू; ‘या’ विविध पदांसाठी करा अर्ज, अंतिम तारीख आली जवळ

विविध पदांनुसारची वयोमर्यादा अधिसूचनेत नमूद करण्यात आलेली आहे. ती तपासून घ्यावी.

लिंक – https://www.nlcindia.in/new_website/careers/Detailed%20Advt%2002%202024.pdf

अर्ज कसा करावा ?

  • सगळ्यात पहिला उमेदवाराने nlcindia.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर करिअर बटणावर क्लिक करा.
  • तालाबिरा प्रकल्पासाठी फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट (FTE)या अर्ज (Apply) लिंकवर क्लिक करा.
  • नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी आवश्यक माहिती भरून घ्या.
  • नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  • सूचना काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज भरा.
  • अर्ज जमा (सबमिट) केल्यावर एक Unique क्रमांक तयार केला जाईल.
  • आवश्यक अर्ज फी भरून घ्या.
  • भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंटआउटसुद्धा काढून ठेवा.

निवड प्रक्रिया –

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड १०० गुणांच्या लेखी परीक्षेवर आधारित असेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी लगेचच या प्रक्रियेसाठी अर्ज करावा.