PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “समुपदेशक” पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. समुपदेशक पदासाठी एकूण २५ रिक्त जागा आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवार अर्ज करू शकता. तुम्हाला प्रश्न पडला असेल की अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती, शैक्षणिक पात्रता आणि वेतन किती? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदाचे नाव – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “समुपदेशक” पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

पदसंख्या – “समुपदेशक” पदांच्या एकूण २५ रिक्त जागेसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

नोकरीचे ठिकाण – पात्र ठरलेल्या उमेदवाराच्या नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड असेल

वयोमर्यादा – या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ३५ वर्षे असावे.

शिक्षण – पात्र उमेदवाराने शैक्षणिक पात्रतेसाठी अधिसुचना नीट वाचावी.

अर्ज पद्धत – या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

हेही वाचा : BOI Officer Recruitment 2024: बँक ऑफ इंडियाद्वारे १४३ पदांसाठी होणार भरती, १० एप्रिलपूर्वी करा अर्ज

अर्ज पाठविण्याचा पत्ता – समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील, मनपा प्राथमिक शाळा, पिंपरीगाव, या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख २ एप्रिल २०२२ आहे.

वेतन – समुपदेशक” पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारास ३० हजार रुपये वेतन दिले जाईल

अधिकृत वेबसाईट – या विषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर https://www.pcmcindia.gov.in/marathi/ या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करावे.
अधिसुचना – अर्ज भरण्यापूर्वी https://www.pcmcindia.gov.in/admin/cms_upload/jobs/16306208351710569475.pdf या लिंकवर क्लिक करून अधिसुचना नीट वाचावी.

अर्ज कसा करावा?

  • अर्ज करण्यापूर्वी अधिसुचना नीट वाचावी.
  • उमेदवाराने आपल्या अर्जाबरोबर शाळा सोडल्याचा दाखला, धारण केलेली शैक्षणिक अहर्ता, पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक, अनुभव प्रमाणपत्र, आधारकार्ड, आरक्षण प्रमाणपत्र तसेच आवश्यक प्रमाणपत्र व कागदप्तराच्या सत्य प्रती सादर करणे बंधनकारक आहे.
  • अपूर्ण माहिती व अटिंची पुर्तता न करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज बाद करून अपात्र ठरवले जाऊ शकतात.
  • शैक्षणित अहर्तेत पात्र ठरलेल्या उमेदवासा अनिवार्य लेखी परिक्षा द्यावी लागेल आणि त्यानंतर लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास मुलाखतीला उपस्थित राहणे बंधनकारक असेल.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc bharti 2024 25 vacancies for counselor post know more about pcmc counselor recruitment 2024 ndj
Show comments