सुहास पाटील

● रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (रेल्वे मंत्रालय, भारत सरकार), रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स (आरपीएसएफ) मध्ये एकूण ४,२०८ कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह)पदांची भरती.

वेतन श्रेणी – पे-लेव्हल – ३ (रु. २१,७००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ४२,०००/-. ( CEN No. RPF ०२/२०२४) (पुरुष – अजा – ५३६, अज – २६८, इमाव – ९६६, ईडब्ल्यूएस – ३५७, खुला – १,४५०) (१० टक्के जागा एकूण ४२० पदे माजी सैनिकांसाठी राखीव) (महिला एकूण ६३१ (अजा – ९५, अज – ४७, इमाव – १७०, ईडब्ल्यूएस – ६३, खुला – २५६))

पात्रता – (दि. १४ मे २०२४ रोजी) १० वी उत्तीर्ण अथवा समकक्ष.

वयोमर्यादा – दि. १ जुलै २०२४ रोजी १८ ते २८ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. १ जुलै १९९६ ते १ जुलै २००६ दरम्यानचा असावा.) (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, माजी सैनिक – डिफेन्समधील सेवाकाल – ३ वर्षे).

शारीरिक मापदंड – पुरुष – उंची – १६५ सें.मी., छाती – ८० ते ८५ सें.मी. (अजा/अज – उंची १६० सें.मी., छाती – ७६.२ ते ८१.२ सें.मी.) महिला – उंची १५७ सें.मी. (अजा/अज – १५२ सें.मी.)

हेही वाचा >>>  ‘राईट टू एज्युकेशन’ कधी?

निवड पद्धती – ( i) लेखी परीक्षा ( CBT), ( ii) शारीरिक क्षमता चाचणी ( PET), शारीरिक मोजमाप ( PMT) यातील कामगिरीवर आधारित. अंतिम निवड कागदपत्र पडताळणीनंतर केली जाईल. (अ) लेखी परीक्षा ( CBT) – १२० प्रश्न/ बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे. कालावधी – ९० मिनिटे. ( i) सामान्य बुद्धिमत्ता अँड रिझनिंग – ३५ प्रश्न. ( ii) अंकगणित – ३५ प्रश्न आणि ( iii) सामान्य जागरुकता – ५० प्रश्न. एकूण प्रश्न १२०. एकूण गुण १२०. प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/३ गुण वजा केले जातील. न सोडविलेल्या प्रश्नांना कोणतेही गुण दिले अथवा वजा केले जाणार नाहीत. (लेखी परीक्षेसाठी पोस्टाने कॉल लेटर पाठविले जाईल. दक्षिण रेल्वे चेन्नई अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांसाठी (महाराष्ट्रातील उमेदवार दक्षिण रेल्वे अंतर्गत मोडतात.)) प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलगू, कन्नड, कोंकणी, उर्दू, मल्याळम इ. पैकी एका भाषेत छापलेले असतील. उमेदवारांनी आपल्याला हवी असलेली भाषा अर्ज भरताना निवडणे आवश्यक.

शारीरिक क्षमता चाचणी (पीईटी) आणि शारीरिक मोजमाप ( PMT). पीईटी पुरुषांसाठी ( i) १,६०० मीटर ५ मिनिटे ४५ सेकंदांत धावणे. ( ii) उंच उडी – ४ फूट, लांब उडी – १४ फूट आणि महिलांसाठी – ८०० मीटर ३ मिनिटे ४० सेकंदांत धावणे. उंच उडी – ३ फूट, लांब उडी – ९ फूट. ण्ँऊ मधून पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रत्येक कॅटॅगरीसाठी असलेल्या रिक्त पदांच्या १० पट उमेदवारांना पीईटी/शारीरिक मोजमाप आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाईल. १,६०० मीटर/८०० मीटर टेस्ट सुरुवातीला घेतली जाईल. त्यात उत्तीर्ण झालेल्यांच्या इतर टेस्ट होतील. उमेदवारांना पीईटीचे ठिकाण, वेळ इ. कळविण्यात येईल. माजी सैनिकांसाठी पीईटी नाही. PET/ PMT फक्त पात्रता स्वरूपाची असेल. पीईटी/शारीरिक मोजमापात उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखत आणि कागदपत्र तपासणीसाठी बोलाविले जाईल. तेव्हा सर्व मूळ कागदपत्र आणि त्याचे सासाक्षांकीत दोन फोटो कॉपी संच (शैक्षणिक पात्रता, वय (१० वीचे प्रमाणपत्र व गुणपत्रक), जातीचा दाखला (केंद्र सरकारच्या नोकरीसाठी विहीत केलेल्या नमुन्यातील), डोमिसाईल, एन्सीसी प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र, खेळांच्या स्पर्धेतील प्रमाणपत्रे तसेच त्यांनी फोटो आणि स्वाक्षरीच्या स्कॅण्ड कॉपीज ( in true colour) इ.) घेवून हजर व्हावे. https:// oirms- ir. gov. in/ rrbdv पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक. (क) कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवारांना वैद्याकीय तपासणीसाठी पाठविले जाईल.

अजा/ अजच्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या वेगवेगळ्या स्तरावरील ई-कॉल लेटरसोबत मोफत रेल्वे प्रवासासाठी स्लीपर क्लास पास उपलब्ध करून दिला जाईल. यासाठी त्यांनी ऑनलाइन अर्जात तशी मागणी करावी लागेल व जातीचा दाखला अपलोड करावा लागेल.

परीक्षा शुल्क – (१) अजा/ अज/ माजी सैनिक/ महिला/ अल्पसंख्यांक/ आर्थिकदृष्ट्या मागासघटक ( EBC) – रु. २५०/-. ( CBT साठी बसलेल्या उमेदवारांना रु. २५०/- परत केले जातील.) वरील कॅटेगरी वगळता इतरांना – रु. ५००/-. (बँकिंग चार्जेस वगळता CBT साठी बसलेल्या उमेदवारांना रु. ४००/- परत केले जातील. परीक्षा शुल्क फक्त ऑनलाइन मोडने भरावयाचे आहेत.)

फीचा परतावा मिळविण्यासाठी उमेदवारांनी आपले बँक डिटेल्स (बँकेचे नाव, अकाऊंट होल्डरचे नाव, अकाऊंट नंबर आणि IFSC Code) यांचा ऑनलाइन अर्जात निर्देश करणे आवश्यक.

शंकासमाधानासाठी हेल्पलाईन नं. ९५९२००११८८ (सकाळी १०.०० ते संध्या. ५.०० वाजे दरम्यान). ई-मेल – rrb. help@csc. gov. in

मेडिकल फिटनेस स्टँडर्ड्स – चष्मा घालणारे, सपाट पाय ( Flat Foot), Knock Knee, तिरळे डोळे, रंगांधळेपणा आणि इतर शारीरिक दुर्बलता असलेले उमेदवार पात्र नाहीत.

RRB मुंबई अंतर्गत येणाऱ्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज www.rrbmumbai.gov.in या संकेतस्थळावर दि. १४ मे २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जासोबत पुढील स्कॅण्ड कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.

(१) अलिकडच्या काळातील काढलेला पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो (पांढऱ्या पार्श्वभूमीवरील) JPEG ईमेज (साईज ३०-७० केबी) (गडद चष्मा आणि/किंवा टोपी न घालता काढलेला (याच्या १२ प्रती निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांनी जपून ठेवाव्यात.))

(२) उमेदवाराची स्वाक्षरी JPEG स्कॅण्ड ईमेज (३०-७० केबी).

(३) अजा/ अज दाखला (ज्यांना निवड प्रक्रियेसाठी जाण्या-येण्याकरिता मोफत रेल्वे प्रवासासाठी). ऑनलाइन अर्जात काही बदल/सुधारणा करावयाची असल्यास रु. २५०/- मॉडिफिकेशन फी भरून तसे दि. १५ मे ते २४ मे २०२४ दरम्यान करता येईल.