किरण सबनीस 
बऱ्याच नव-तरुणांना ( GenZ) काही अपरंपरागत कार्यक्षेत्र शोधून काढायची आहेत, त्यामध्ये काम करायचे आहे, स्वत:च्या कल्पनांवर आधारित नवीन उद्याोग, स्टार्ट-अप सुरू करायचे आहेत. अर्थात कोणतीही नवीन संकल्पना, विचार, प्रक्रिया, समस्या संशोधन आणि त्यावरील उपाय याचा गाभा हा सर्जनशीलता ( Creativity) असतो. त्यामुळेच सर्जनशीलतेवर आधारित ‘क्रिएटिव डिझाईन करिअर’ ही आजच्या GenZ विद्यार्थ्यांची व जगाची महत्त्वाची गरज बनली आहे.

रोजच्या आयुष्यातील डिझाईनचे वाढणारे महत्त्व…

आजच्या काळात ‘डिझाईन’ हा जरी एक परवलीचा शब्द झाला असला व त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यात सर्वत्र दिसत असला तरी त्याची सखोल माहिती खूप कमी विद्यार्थ्यांना असते. पुढील उदाहरणांवरून आपण बदलणाऱ्या ‘डिझाईन’ क्षेत्राची आणखी ओळख थोडक्यात करून घेऊया. आपल्या रोजच्या जीवनातील कामे ( Activities) किंवा काही सेवा ( Services) कशाप्रकारे वापरतो आणि त्यांच्यावर ‘डिझाईन’ क्षेत्राचा परिणाम कसा होतो हे पाहूया. उदा. १. ‘दात घासणे’ ही क्रिया करताना आपण घरातील बेसिन जवळच्या कपाटातून दात घासायचा ब्रश हातामध्ये घेऊन त्यावर योग्य प्रमाणात पेस्ट लावतो, नंतर बेसिनचा नळ चालू करून आरशामध्ये पहात दात घासणे पूर्ण करून आपले तोंड नॅपकिन/ टॉवेल पुसून ही क्रिया संपवतो. उदा. २ – आपल्याला एखाद्या चित्रपटाचे तिकीट काढायचे असेल तर आपण मोबाइलचा वापर करून त्यातील योग्य अॅप किंवा संकेतस्थळावर जाऊन हवे ते चित्रपटगृह, वेळ, रांग, जागा निवडतो. त्याचे ऑनलाइन पैसे पाठवून देतो. त्वरित आपल्याला एक मेसेजही येतो व तिकीट तपशीलासह पावती पण मिळते, आपण चित्रपटगृहमध्ये गेल्यावर ते मोबाइलवरील तिकीट स्कॅन केले जाते व आपण चित्रपटाचा आनंद मनमुराद लुटू शकतो. पहिल्या उदहरणामध्ये वापरेली प्रत्येक वस्तू – ब्रश, पेस्ट, बेसिन, नळ, नॅपकिन इत्यादी – डिझाईन करताना ‘डिझाईनर’ने सर्व वापरकर्त्यांच्या गरजा, अपेक्षा, क्षमता, आवडी निवडी या विचारात घेतलेल्या असतात. आपल्याला साध्या वाटणाऱ्या नेहमीच्या वापरातल्या दात घासायच्या ब्रशचे डिझाईन करणे वाटते तेवढे सोप्पे नसते, त्यासाठी अनेक बारिकसारिक बाबींचा सखोल विचार डिझाईनर करत असतो. उदा. हाताच्या पंजाचा आकार, बोटांची व स्नायूंची रचना, दातांची रचना, ब्रशचा आकार, हँडलची लंबी रुंदी, रंग संगती, त्याचे पॅकेजिंग, मार्केटिंग व ब्रँड, ग्राफिक्स. त्याचप्रमाणे दुसऱ्या उदहरणामधील ‘ऑनलाइन तिकीट काढणे’ ही सेवा अनुभव डिझाईन ( Service Experience Design) करताना डिझाईनर वापरकर्त्यांची गरज, सभोवतालचा संदर्भ, कार्यपद्धती, मानसिकता, बदलत्या तंत्रज्ञान विषयी माहिती, आवडी निवडी हे प्रामुख्याने विचारात घेतो. ही सर्व डिझाईन प्रकिया ‘वापरकर्त्याना केंद्रस्थानी’ ( User Centric Approach) ठेऊन केलेली असते आणि त्यामुळे काहीप्रमाणात त्यामध्ये विषयनिष्ठता असते.

two accidents between chiplun to wavanje due to lack of road widening
चिपळे ते वावंजे रस्ता रुंदीकरणाअभावी अपघातांचे सत्र सूरुच; दोन अपघातांमध्ये एक महिलेचा मृत्यू तर तीघे जखमी 
Expert guidance on post 12th opportunities
बारावीनंतरच्या संधींबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
santosh pathare, aamhi documentarywale, dr santosh pathare documentary making journey, documentary making process, documentary making, documentary, Sumitra Bhave Ek Samantar Prawaas, Search of Rituparno,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : माणसं आणि काळाचे दस्तावेजीकरण
india sebi advises regulators to supervise cryptocurrency trading
‘क्रिप्टो’ व्यवहारांवर नियंत्रणासाठी सेबी अनुकूल; रिझर्व्ह बँकेच्या भूमिकेला छेद देणारा पवित्रा
Google Generative Search AI Features in Marathi
Googleच्या जेमिनी-AI सह करता येईल ‘जेवणाचे प्लॅनिंग, व्हिडीओवरून शोध’! काय आहेत भन्नाट फीचर्स, पाहा
Air India Express staff fell ill suddenly
एअर इंडिया एक्स्प्रेसचे कर्मचारी सामूहिकरीत्या अचानक पडले आजारी; आंदोलनासाठी वैद्यकीय रजेचा वापर कशासाठी?
ed seizes rs 30 crore unaccounted in jharkhand
अन्वयार्थ: ध्वनिचित्रमुद्रणांच्या साथीने कायद्याऐवजी राजकारण
Anti-Rape Wears To Avoid Rape Cases:
Anti Rape Underwear काय काम करतात बघा; श्रीमंतीच्या वेडात उत्पादकांनी महिलांच्या ‘या’ प्रश्नांची उडवली खिल्ली

डिझाईन क्षेत्र फक्त वस्तूंच्या बाह्य स्वरूपावर आणि वापरण्याच्या सोयीस्करपणावरच प्रभाव टाकत नाही तर ते आपल्या आजूबाजूचे आरोग्य, शिक्षण, अर्थकारण, बँकिंग, क्रीडा, करमणूक, इ कॉमर्स, दूरसंचार अशाप्रकारच्या अनेक सेवा कशाप्रकारे उपयुक्त, सोप्या, व परिणामकारक होऊ शकतील याचा विचार करते. उदाहरणार्थ, चांगल्या प्रकारची ‘सेवा अनुभव डिझाईन’ देणाऱ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अधिक आरामदायी वाटू शकते आणि त्यांच्या बरे होण्याच्या प्रक्रियेला मदत करू शकते. तेथील डॉक्टर आणि सहकाऱ्यांची कार्यक्षमता व समाधान वाढू शकते, तसेच रुग्णांचे नातेवाईक तणावमुक्त व सकारात्मक मनस्थितीमध्ये राहू शकतात. त्याचप्रमाणे एखाद्या शाळेची डिझाईन परिसंस्था ( Ecosystem) सुयोग्य केल्यास – विद्यार्थी-केंद्रित अभ्यासक्रम, शिक्षण पद्धती, पुस्तकांची नवीन रचना, योग्य तंत्रज्ञानाचा वापर, शाळेची अंतर्गत रचना, रंग-संगती, वर्गाची व बसण्याची नवीन मांडणी, पालकांचा योग्य सहभाग – विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला अनुकूल आणि आनंददायी वातावरण प्रदान करू शकते.

डिझाईन हे आपल्या भोवतालच्या जगाचा एक अविभाज्य भाग बनले आहे आणि ते आपल्यावर अनेक प्रकारे प्रभाव करत असते. चांगल्या व सुसंदर्भित ( Contextual) डिझाईनमुळे आपले जीवन अधिक सोपे, अधिक आनंददायक आणि अधिक अर्थपूर्ण बनू शकते. या क्षेत्रात जर आपल्याला करिअर करायचे असेल तर सर्जनशीलते बरोबरच तंत्रज्ञानात, समाजात, अर्थकारणात, कला, संस्कृतीमध्ये सतत होणारे बदलांचा जाणीवपूर्वक अभ्यास केला पाहिजे.

क्रिएटिव्ह डिझाईन हे क्षेत्र सध्या झपाट्याने वाढत आहे. त्याची व्याप्ती व खोली समजून घेणे आणि त्यात करिअर कसे करता येईल याची माहिती या लेखमालेत आपल्याला मिळणार आहे. दर पंधरा दिवसांनी...

(लेखक भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईमधून डिझाईनमधील पदवीधर. कॉर्पोरेट व शिक्षण क्षेत्रात २८ वर्षांहून अधिक अनुभव.)