दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ( SECR), डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल, नागपूर डिव्हिजन ॲप्रेंटिसेस ॲक्ट, १९६१ अंतर्गत ८६१ जागांवर आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची ॲप्रेंटिसशिपसाठी रएउफ नागपूर डिव्हिजन आणि मोतीबाग वर्कशॉप, नागपूरमध्ये वर्ष २०२४-२५ करिता भरती. ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशील –

( I) नागपूर डिव्हिजन (ए०५२०२७०२६९५) – ७८६ पदे.

UPSC Preparation Civil Services Aptitude Test
UPSCची तयारी: नागरी सेवा कल चाचणी (CSAT) (भाग १)
icar iari recruitment 2024
परीक्षा न देता भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये मिळवा नोकरीची संधी! ५४ हजार पर्यंत मिळू शकतो पगार
SSC CHSL 2024 Recruitment OTR and Application Module
SSC CHSL 2024 Recruitment: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! अर्ज करताना OTR आणि Live फोटो काढणे आवश्यक
BECIL Recruitment 2024
BECIL Recruitment 2024 : पदवीधारकांना नोकरीची संधी! ३० हजार पगार मिळणार, आजच अर्ज करा
NPCIL Mumbai Bharti 2024
सरकारी नोकरी करण्याची संधी; ४०० पदांसाठी थेट भरती, ५५ हजारांपर्यंत पगार, जाणून घ्या कसा कराल अर्ज
Naval Dockyard Mumbai Recruitment 301 Vacancies for Apprentice posts Know all details for online application
Naval Dockyard Bharti 2024: मुंबईत नोकरीची संधी! नेव्हल डॉकयार्डने जाहीर केली नवीन भरती; ‘असा’ करा अर्ज
SAI recruitment 2024 job post
SAI recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी! मिळणार ‘इतक्या’ लाखांचा पगार…
Education Opportunities Opportunities for Ph D M Sc Recruitment for Integrated Course
शिक्षणाची संधी: पीएच.डी.साठी संधी

(१) वेल्डर (गॅस ॲण्ड इलेक्ट्रिक) १९ पदे (२) टर्नर – १० पदे (३) फिटर – ९० पदे (४) इलेक्ट्रिशियन – १८५ पदे (५) स्टेनोग्राफर (इंग्लिश)/ सेक्रेटरिअल असिस्टंट – १९ पदे (६) स्टेनोग्राफर (हिंदी) – ८ पदे (७) COPA – ११४ पदे (८) हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर – २ पदे (९) मशिनिस्ट – २२ पदे (१०) डिझेल मेकॅनिक – ९० पदे (११) प्लंबर – २४ पदे (१२) पेंटर – ४० पदे (१३) वायरमन – ६० पदे (१४) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – १२ पदे (१५) अप हुल्स्टर (ट्रिमर) – २ पदे (१६) डेंटल लॅब टेक्निशियन – १ पद (१७) हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन – २ पदे (१८) गॅस कटर – ७ पदे (१९) केबल जॉईंटर – १० पदे (२०) ड्रायव्हर कम मेकॅनिक ( LMV) – २ पदे (२१) मेकॅनिक मशिन टूल मेंटेनन्स – १२ पदे (२२) मेसॉन (बिल्डिंग कन्स्ट्रक्टर) – २७ पदे (२३) कारपेंटर – ३० पदे

( II) मोतीपूर वर्कशॉप, नागपूर (ए०५२०२७०२४९४) – ७३ पदे.

(१) फिटर – ३५ (२) वेल्डर – ७ (३) कारपेंटर – ४ (४) टर्नर – २ (५) इलेक्ट्रिशियन – १ (६) पेंटर – १२ (७) सेक्रेटरिअल स्टेनो इंग्लिश प्रॅक्टिस – ३

अजा/ अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस/ दिव्यांग/ माजी सैनिक यांचेसाठी काही पदे नियमानुसार राखीव आहेत.

सर्व पदांसाठी ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा कालावधी १ वर्षाचा असेल.

पात्रता – (दि. १० एप्रिल २०२४ रोजी) १० वी किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स सर्टिफिकेट.

वयोमर्यादा – (दि. १० एप्रिल २०२४ रोजी) १५ ते २४ वर्षे (इमाव – २७ वर्षेपर्यंत, अजा/ अज – २९ वर्षेपर्यंत, विकलांग – ३४ वर्षेपर्यंत) (खुल्या गटातील उमेदवाराचा जन्म २ एप्रिल २००० ते २ एप्रिल २००९ दरम्यानचा असावा.).

अर्जाचे शुल्क – रु. १००/-. (अजा/ अज/ महिला/ विकलांग यांना फी माफ आहे.)

निवड पद्धती – आलेल्या अर्जातून १० वी आयटीआयमधील गुण एकत्र करून गुणवत्ता यादी बनविली जाईल. कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांना इतर मूळ कागदपत्रांसोबतच मेडिकल सर्टिफिकेट सादर करावे लागेल.

स्टायपेंड – ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना १ वर्षाचा आयटीआय ट्रेडमधील कोर्स केला आहे त्यांना रु. ७,७००/- दरमहा; ज्यांनी २ वर्षांचा आयटीआय ट्रेडमधील कोर्स केला आहे त्यांना रु. ८,०५० दरमहा स्टायपेंड दिले जाईल.

फोटोग्राफची स्कॅण्ड /सॉफ्ट कॉपी – ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी आपला रंगीत फोटोग्राफ (जो अर्ज करण्याच्या दिवसाच्या ३ महिन्यांपूर्वी काढलेला नसावा). उमेदवारांनी अपलोड केलेल्या फोटोग्राफच्या आणखी २ कॉपीज कागदपत्र पडताळणी वेळी सादर कराव्या लागतील. सिग्नेचरची स्कॅण्ड/ सॉफ्ट कॉपी – उमेदवारांनी आपली सही अपलोड करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्जासोबत स्कॅण्ड करून अपलोड केलेली कागदपत्रे जर विहीत नमुन्यातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेली नाहीत, हे कागदपत्र पडताळणीच्या वेळी निदर्शनास आले तर उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

शंकासमाधानासाठी मोबाईल नं. ८२०८८३०२७० वर व्हॉटस अप करा; ई-मेल sandeepm.rrqs @gov. in किंवा कामकाजाच्या दिवशी सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते संध्याकाळी १७.३० वाजेदरम्यान पुढील पत्त्यावर संपर्क साधा – सिनियर डिव्हीजिनल पर्सोनेल ऑफिस, डीआरएम ऑफिस कॉम्प्लेक्स, वॉल्टिअर गेट, रायपूर, छत्तीसगड – ४९२ ००८.

उमेदवारांना ॲप्रेंटिसशिप दरम्यान रेल्वेकडून रहावयाची सोय करण्यात येणार नाही. त्यांना आपली स्वतची सोय करावी लागेल. उमेदवार अर्ज करण्यासाठी नागपूर डिव्हिजन किंवा मोतीबाग वर्कशॉप, नागपूर यापैकी एक निवडू शकतात. ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यावर उमेदवारांना रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल, तो त्यांनी पुढील भरतीप्रक्रियेसाठी जपून ठेवावा. अजा/ अज/ इमाव उमेदवारांनी केंद्र सरकारी नोकरीसाठी विहीत केलेल्या नमुन्यातील जातीचा दाखला सादर करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज https:// www. apprenticeshipindia. gov. in या संकेतस्थळावरून दि. ९ मे २०२४ (२४.०० वाजे) पर्यंत करावेत.