प्रवीण चव्हाण 
यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या तयारीतील अत्यंत महत्त्वाचा घटक असणाऱ्या भारतीय राज्यव्यवस्थेतील केंद्र-राज्य संबंध, घटनादुरुस्ती, घटनात्मक संस्था व बिगर-घटनात्मक संस्था याची चर्चा आपण आजच्या लेखामध्ये करणार आहोत. भारतीय राज्यव्यवस्थेवर विचारलेल्या एकूण प्रश्नांची संख्या लक्षात घेता ज्या घटकांवर जास्त प्रश्न विचारले जातात त्या घटकांची चर्चा या लेखात केली आहे. वर नमूद केलेल्या उपघटकांवरती विचारलेल्या प्रश्नांची संख्या फारशी नाही. मात्र परीक्षेच्या तयारीच्या स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून आपल्याला या घटकांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या घटकांवर विचारलेल्या प्रश्नांची काठिण्यपातळी फार नाही. त्यामुळे हे प्रश्न बरोबर आल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदाच होणार आहे.

भारतीय राज्यघटनेच्या अकराव्या भागामध्ये केंद्र-राज्य संबंधातील प्रशासकीय आणि कायदेशीर बाबी, बाराव्या भागांमध्ये वित्तीय बाबी तर भाग १३ मध्ये व्यापारी बाबी समाविष्ट केल्या आहेत. याचा अभ्यास करताना प्राधान्याने भाग ११ मधील कायदेशीर बाबी व भाग १२ मधील वित्तीय बाबी यांना प्राधान्य द्यावे. भाग बारामधील वित्तीय संबंधांचा विचार करता कलम २८० मधील वित्त आयोग, आयोगाचे कार्य, आयोगाची रचना इत्यादीचा तपशीलवार अभ्यास करावा. केंद्र-राज्य संबंधातील व्यापारी संबंध या घटकावर फारसे प्रश्न विचारलेले आढळून येत नाहीत.

recession in india latest news in marathi
मंदीच्या कृष्णछाया दिसत आहेत?
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
UPSC Preparation Judiciary Main Exam General Studies
upscची तयारी: न्यायव्यवस्था (न्यायमंडळ)
isro mission SSLV D3
UPSC Key : यूपीएससी सूत्र : ISRO च्या SSLV-D3 मोहीमेचे महत्त्व अन् कर्करोगावरील औषध भारतात आणण्याबाबतचे नियम, वाचा सविस्तर…
The post of CEO of semiconductor industry America to the economy
चिप चरित्र: एक स्वप्नवत् प्रस्ताव!
govt introduce banking reforms bill in lok sabha four nominees allow to a bank
बँक खात्याला चौघांचे नामनिर्देशन शक्य; लोकसभेत बँकिंग सुधारणा विधेयक सादर
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी :  घटनात्मक व बिगर घटनात्मक संस्था
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : भारतीय अर्थव्यवस्था – गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा

भारतीय राज्यघटना ताठरता व लवचिकता यांचे मिश्रण मानले जाते. घटनादुरुस्तीची प्रक्रिया सोपी असेल तर राज्यघटना लवचिक आहे आणि घटनादुरुस्तीची प्रक्रिया अवघड असेल तर ती ताठर आहे, असे म्हटले जाते. राज्यघटनेच्या कलम ३६८ मध्ये घटनादुरुस्तीच्या तरतुदी तपशीलवार दिलेल्या आहेत. अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी घटनादुरुस्तीची संकल्पना समजून घेऊन तिच्या शॉर्ट नोट्स काढाव्यात. याचबरोबर घटनादुरुस्ती संबंधित महत्त्वाचे खटले तसेच घटनेच्या मूलभूत संरचनेचा सिद्धांत याचा देखील अभ्यास करावा. आतापर्यंत १०६ घटनादुरुस्त्या झालेल्या आहेत. त्या सर्व घटनादुरुस्त्या लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यातील काही महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या आवर्जून लक्षात ठेवाव्यात. घटनादुरुस्तीवर थेट प्रश्न विचारलेला नसला तरी देखील इतर प्रश्न सोडवताना घटनादुरुस्तीचा क्रमांक व संदर्भ माहिती असेल तर तो प्रश्न सहजपणे सोडवता येतो. घटनादुरुस्ती क्रमांक १, २१, २४, २५, ३८, ४२, ४३, ४४, ५२, ६१, ७१, ७३, ७४, ८७, ९२, ९३, ९७, ९९, १०२ या क्रमांकाच्या घटनादुरुस्त्या महत्त्वाच्या आहेत.

आता आपण पूर्व परीक्षेतील घटनात्मक आणि बिगर-घटनात्मक संस्था याकडे वळूया. पूर्व परीक्षांच्या प्रश्नांचे विश्लेषण केले असता घटनात्मक संस्थांवर विचारलेले प्रश्न अधिक आहेत तर बिगर-घटनात्मक संस्थावर मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले दिसून येतात. ज्या संस्थांचा उल्लेख राज्यघटनेमध्ये आहे अशा संस्था घटनात्मक संस्था म्हणून ओळखल्या जातात तर ज्या संस्थांचा उल्लेख राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे केलेला नाही, अशा संस्था बिगर-घटनात्मक संस्था म्हणून ओळखल्या जातात. अशा बिगर-घटनात्मक संस्थांची स्थापना किंवा निर्मिती कायद्यान्वये झाली असल्यास त्या संस्थांना कायदेशीर किंवा वैधानिक संस्था असे म्हणतात. एखाद्या बिगर घटनात्मक संस्थेची निर्मिती कायद्यान्वये न होता मंत्रिमंडळाच्या ठरावाच्या आधारे देखील होऊ शकते. उदाहरणार्थ नीती आयोग. आतापर्यंत आयोगाने यावर प्रश्न विचारताना पुढील कोणती संस्था घटनात्मक आहे किंवा नाही अशा आशयाचा प्रश्न विचारला आहे. ही संकल्पना माहीत असेल तर असे प्रश्न सोडवणे सोपे जाते. या सर्व घटनात्मक संस्थांची रचना, सदस्यांची नेमणूक, त्यांचा कार्यकाळ, संस्थांची कार्ये या सर्व माहितीचा तुलनात्मक पद्धतीने अभ्यास केला तर यावर विचारलेला प्रश्न चुकणार नाही. याच्या जोडीला बिगर-घटनात्मक संस्था कोणत्या आहेत, त्यांचे नेमके कार्य काय आहे, याचा देखील अभ्यास करावा. या सर्व संस्थांची माहिती एम.लक्ष्मीकांत किंवा द युनिक अॅकॅडमीच्या ‘भारतीय राज्यघटना आणि घटनात्मक प्रक्रिया-खंड एक’ या पुस्तकांमध्ये सविस्तर दिलेली आहे.

आता आपण या घटकाची अभ्यास प्रक्रिया समजून घेऊया. विद्यार्थ्यांनी संदर्भ पुस्तकातून आत्तापर्यंत सांगितलेल्या सर्व घटकांचे सखोल वाचन करावे. त्या सर्वांच्या शॉर्ट नोट्स काढाव्यात व वारंवार त्याची उजळणी करावी. प्रत्येक घटकावर यापूर्वीच्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न तसेच प्रत्येक घटकावरील सराव प्रश्न सोडवावेत. सराव प्रश्न सोडवताना तो चुकला असेल तर तो नेमका का चुकला आहे, याचे विश्लेषण करावे. अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकता वाटल्यास ती बाब आपल्या शिक्षकांकडून किंवा सहकारी विद्यार्थी मित्र-मैत्रिणींकडून समजून घ्यावी. या विषयातील काही बाबी पाठ करण्याची आवश्यकता असेल तर त्या बाबी आवर्जून पाठ कराव्यात, ज्यामुळे परीक्षेत प्रश्न चुकणार नाही. प्रत्येक घटकावरील सराव प्रश्न सोडवल्यानंतर सर्व घटकांवर आधारित कॉम्प्रेसिव्ह टेस्ट सोडवावी. ही टेस्ट सोडवताना त्यामध्ये देखील होणाऱ्या चुका लक्षात घ्याव्यात व पुन्हा त्या आपल्याकडून होणार नाहीत यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.

या लेखामध्ये तसेच यापूर्वीच्या लेखांमध्ये सांगितलेली संदर्भ पुस्तके सारखी सारखी वाचावीत. या विषयासाठी अनेक पुस्तके वाचण्याची आवश्यकता नाही. संदर्भ पुस्तके वाचून झाली असतील आणि अजून वाचनाची आवश्यकता वाटत असेल तर भारतीय संविधानाचा कोणताही एक भाग घेऊन तो शांतपणे वाचावा. आवश्यकतेप्रमाणे त्याच्या शॉर्ट नोट्स काढाव्यात. हे सर्व केल्यानंतर या घटकावरील प्रश्न पूर्व परीक्षेमध्ये चुकणार नाहीत. येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा!