मागील लेखामध्ये आपण हिवाळा ऋतूमधील आहाराच्या सर्वसाधारण वेळांबद्दल माहिती घेतली. या लेखामध्ये हिवाळा
ऋतूमधील सर्वसाधारण आहाराबद्दल जाणून घेऊ. कबरेदके, प्रथिने, चरबीयुक्त पदार्थ, खनिज पदार्थ, जीवनसत्त्व, पाणी इत्यादी आहाराचे प्रमुख घटक असतात. ऋतुमानानुसार त्यातील वेगवेगळे पदार्थ आहारात घेणे गरजेचे असते. तरच आवश्यक ते पदार्थ शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जातात. आहारात वैविध्य ठेवणे महत्त्वाचे आहे. वैविध्य असल्यास सगळ्या पदार्थामधील सगळे गुणधर्म
मिळू शकतात.
कबरेदके – सर्व धान्ये, भात, बटाटे, साखर इत्यादी पदार्थामधून कबरेदके जास्त प्रमाणात मिळतात. हिवाळ्यामध्ये नाचणी, बाजरी, गहू, आदी धान्यांचा वापर जास्त करावा. ज्वारी कमी प्रमाणात वापरावी. हातसडीचा तांदूळ वापरावा. ओट्स, व्हीटफ्लेक्स खाण्यास हरकत नाही.
प्रथिने – सर्व डाळी कडधान्ये भरपूर प्रमाणात
खाऊ शकता. मोड आलेली कडधान्ये जास्त
प्रमाणात खावीत. या ऋतूत पचनशक्ती चांगली असल्याने मोड आलेली जी कडधान्ये कच्ची खाऊ शकतो, ती कच्चीच खावीत. इतर वाफवून घ्यावीत. पचनाची तक्रार असणाऱ्यांनी मूग, मसूर जास्त
प्रमाणात खावे.
दूध आणि दुधाचे पदार्थ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. कृश व्यक्तींनी व लहान मुलांनी सायीसकट दूध घ्यायला हरकत नाही. मधुमेह, हृदयविकार दूध साय काढून वापरावे. या ऋतूमध्ये नेहमी गरम दूध घ्यावे. दुधाचे इतर पदार्थ जसे की दही, ताकही ताजे असावे.
चिकन, मटण, मासे, अंडी हाही प्रथिनांचा
उत्तम स्रोत आहे. पचनशक्ती चांगली असल्याने मांसाहार आठवडय़ातून २-३ वेळा करण्यास
हरकत नाही.

– dr.sarikasatav@rediffmail.com

What is Sleep Divorce
Sleep Divorce म्हणजे काय? जोडप्यांनी रात्री वेगळं झोपणं कितपत फायदेशीर?
how to make kaju curry at home
Recipe : घरच्याघरी बनवा ढाबा स्टाईल ‘काजू करी’! जाणून घ्या अचूक प्रमाण अन् कृती….
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?