|| गायत्री कशेळकर

महाविद्यालयीन वर्गातील तरुण-तरुणींवर बऱ्याचदा परीक्षा, अभ्यास, सबमिशन्स, एकमेकांशी स्पर्धा यांचा ताण असतोच. त्यामुळे त्याचा परिणाम या मुलांच्या मानसिकतेवर होऊ लागला आहे. तरुणवर्ग हा मानसिक ताण कमी करण्यासाठी चुकीचा आहार घेतो किंवा जंक फूडचा वापर करतो. त्याचा दुष्परिणाम होतोच, मात्र ते टाळता येणे शक्य आहे.- तरुणांच्या आहाराचा हा भाग २..

heatwave again in india
हवामान बदलामुळे उष्णतेची लाट पुन्हा उसळणार? उष्णतेच्या लाटांचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो?
benefits of turmeric milk and turmeric water
तुम्ही हळदी दूध प्यावे की हळदीचे पाणी? कोणत्या पेयाचा होतो सर्वाधिक फायदा; घ्या जाणून….
Moong dal samosa recipe
घरात सर्वांना नक्की आवडतील मूग डाळीचे हेल्दी समोसे; नोट करा ‘ही’ हटके रेसिपी
Health Benefits of Lassi
तुम्ही उन्हाळ्यात रोज ताक किंवा लस्सी प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
hormonal imbalance in marathi
Health Special: संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स) म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
nagpur crime news, nagpur sexual assault marathi news
नवविवाहितेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून छळ
Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा

मागील लेखात आपण तरुण-तरुणी कशा प्रकारे ‘फॅड डाएट’च्या आहारी जाऊ शकतात व त्यामुळे त्याचा कशा प्रकारे शरीरावर दुष्परिणाम होतो याची माहिती घेतली. या लेखात आपण तरुणवर्ग मानसिक ताण कमी करण्यासाठी कशा प्रकारे चुकीचा आहार किंवा जंक फूडचा वापर करतात ते बघू.

महाविद्यालयीन तरुण-तरुणींवर बऱ्याचदा परीक्षा, अभ्यास, सबमिशन्स, एकमेकांशी स्पर्धा यांचा ताण असतोच. त्यामुळे त्याचा परिणाम या मुलांच्या मानसिकतेवर होऊ लागला आहे. सततचा ताण, रोजची धावपळ यामुळे आहाराची काळजी तर सोडाच, पण बऱ्याचदा अतिप्रमाणात गोड पदार्थ, केक, पेस्ट्री असे पदार्थ खाऊन ‘मानसिक नराश्यावर मात करता येते’ अशी चुकीची समजूत अनेकांच्या मनात असते. अशा प्रकारे मनावरील ताण हलका करण्यासाठी या जंक फूड रूपातील अन्नाचा शरीरावर काय-काय वाईट परिणाम होऊ शकतो याची कल्पना तरी आहे का?

अ‍ॅनोरेक्सिया नव्‍‌र्होसा (Anorexia Nervosa) – यालाच मराठीत ‘मनोजन्य क्षुधानाश’ असेही म्हणतात. यात यंगस्टर्स उपासमार करून स्वत:चेच नुकसान करून घेतात. जगभरात केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून येते की, या प्रकारचा मानसिक आजार मुलांच्या तुलनेने मुलींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आणि याच्या आहारी तरुण पिढी पटकन जाते. यामध्ये तरुणी आवश्यक वजनापेक्षा ८५ टक्के वजन कमी ठेवण्याकरिता धडपडत असतात. त्यामुळे जेव्हा वजन, उंचीवाढीचा काळ असतो, तेव्हा शारीरिक वाढ पूर्ण न होता वजन हे वयाच्या किती तरी पट खालच्या पातळीवर खुंटते. त्यामुळे अनेक व्याधींना आमंत्रित केल्यासारखे होते. याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे योग्य वयोमानानुसार, उंचीनुसार कमी वजन असणे व सलग ३ महिने मासिक पाळी न येणे हे आहेत. यामध्ये –  १) अन्न हे पूर्णपणे टाळले जाते. यालाच Starvation अर्थात उपासमार असे म्हणतात.

२) खाल्लेले अन्न बाहेर काढले जाते. (उलटीच्या रूपात). यामुळे मानसिक नराश्य येऊ शकते.

यामध्ये दिसणारी लक्षणे  –

१) केस अतिप्रमाणात गळणे, वारंवार तुटणे.

२) हातपाय थंड पडणे, कमी रक्तपुरवठा झाल्याने निळे पडणे.

३) हृदयाचे ठोके कमी होणे.

४) रक्तदाब कमी होणे.

५) अ‍ॅसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेस हे दिसून येते.

बुलिमिया नव्‍‌र्होसा (Bulimia Nervosa) – यालाच मराठीत ‘क्षुधातिरेक चेतापदशा’ असेही म्हणतात. यात आत्मप्रेरित उलटय़ा (Self Induced Vomiting) करून किंवा Laxatives घेऊन खाल्लेले अन्न बाहेर काढणे तसेच अतिरिक्त प्रमाणात व्यायाम करून कॅलरीज जास्त प्रमाणात जाळण्याचे काम केले जाते. बऱ्याचदा यामध्ये कमी वेळेत जास्त प्रमाणात अन्न खाऊन नंतर ते बाहेर काढले जाते, त्यामुळे आपण किती वेळात किती प्रमाणात व काय खाल्ले याचे त्या व्यक्तीस भानच नसते. अशा प्रकारच्या व्यक्तींमध्ये सतत चिडचिडेपणा, नराश्य, मूड सतत बदलणे यांसारखी लक्षणे मोठय़ा प्रमाणात दिसून येतात.

यामध्ये दिसणारी लक्षणे  –

१) सतत उलटय़ा करून कानाजवळील स्थित ग्रंथी (Parotid gland)ला सूज येणे.

२) दातावरील आवरण निघून जाणे.

३) शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होणे.

४) घशाला सूज येणे.

५) अन्ननलिकेला सूज येणे.

६) उलटीद्वारे रक्त पडणे.

७) पोटदुखी.

हे दिसून येते.

क्रीडापटू मुलींमधील चुकीच्या खाण्याच्या पद्धती – या प्रकारचा मानसिक चुकीचा आहार हा क्रीडापटू, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, बॅले डान्स करणाऱ्या मुलींमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसून येतो, कारण ‘वजन वाढू न देता बारीक दिसावे’ याचे खूळ असते. यालाच ‘Female Athelete Traia’ असे म्हणतात. या प्रकारात या क्रीडापटू उपासमार, उलटीद्वारे अन्न बाहेर काढणे याबरोबरच Sports Activity करत असतात. त्यामुळे शरीरावर भयानक परिणाम दिसतो. या आजारामध्ये कॅलरीजची कमतरता, मासिक पाळी न येणे व हाडांची ठिसूळता ही तीन मुख्य लक्षणे दिसून येतात.

यामध्ये वजन कमीत कमी राहण्यासाठी मुद्दाम ‘कमी कॅलरीज’ घेतल्या जातात. त्यामुळे कॅलरीजबरोबर अनेक न्यूट्रियंटची कमतरता जाणवू लागते. ‘ए२३ॠील्ल’ या हार्मोनची पातळीदेखील कमी होते. त्याचा परिणाम म्हणजे ‘अनियमित मासिक पाळी’ या दोन्ही कारणांमुळे हाडांची घनता कमी होऊन हाडे ठिसूळ होऊ लागतात. त्यालाच ‘ऑस्टिओपोरोसिस’ असे म्हणतात.

एका प्रसिद्ध सर्वेक्षणातून असे दिसून आले की, क्रीडापटूंना जितक्या कॅलरीज त्यांच्या गरजेनुसार आवश्यक असतात त्यापेक्षा किती तरी कमी कॅलरीज या आजारामध्ये घेतल्या जातात आणि व्यायाम किंवा सराव त्या तुलनेने जास्त होतो. हे करतानाच त्याबरोबर सतत वजन तपासत राहणे, जर वजन थोडेफार वाढले तर कॅलरीज कमी करण्याच्या नादात अन्न कमी घेणे किंवा खाणे टाळणे असे दिसून येते.

यावरील उपाय –

अशा मानसिक स्थितीतून बाहेर वेळेतच काढणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे सतत पौष्टिक आहार, उत्तम व्यायाम, संतुलित व हेल्दी/ तंदुरुस्त जीवन याबद्दलची माहिती देणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनशैलीनुसार, त्याच्या आवडीनिवडीनुसार, कामाच्या वेळा यानुसार आहाराचे गणित ठरते.

अन्न हे कधीही बक्षीस किंवा मोबदला म्हणून देऊ नये. उदाहरणार्थ – तू जर इतके मार्क्‍स मिळवले तर तुला पिझ्झा किंवा केक देईन.

महाविद्यालयामधील सबमिशन्स, अभ्यास, परीक्षेमुळे रात्री जागरणे होतात. त्या वेळेस चहा, कॉफीचे अतिसेवन टाळावे. त्याऐवजी फळे, ताज्या फळांचा रस, लिंबू पाणी, कोकम हे उत्तम पर्याय ठरतात.

परीक्षा संपल्यानंतर किंवा शेवटचा पेपर झाल्यानंतर हाय कॅलरीज फूड/ जंक फूड यांचा पर्याय नसावा.

तरुण पिढीला दारू, सिगरेट, तंबाखू याचे व्यसन लागू नये याकरिता पालकांनी, शिक्षकांनी वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे.

पाण्याऐवजी सॉफ्ट ड्रिंकचा वापर करू नये. क्रीडापटूंमध्ये किंवा नियमित सराव करणाऱ्यांमध्ये उत्तम आहार व व्यायाम यांचे समतोल राखणे व त्याबाबतचे मार्गदर्शन उपयोगाचे ठरते.

जेवण कमी जात असेल, भूक मंदावणे, अनियमित मासिक पाळी, सतत येणारे नराश्य ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

आहारामध्ये साखर, मध, गूळ, मदा, ब्रेड, बिस्किटे अशा ‘रेडी टू इट’ पर्यायांऐवजी गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये, ज्वारी, बाजरी यांचा समावेश करावा. यामध्ये उत्तम प्रतीच्या कबरेदकांप्रमाणेच काही प्रमाणात ‘ब जीवनसत्त्वे’, प्रथिने व फायबर असतात, ज्याचा शरीराला उपयोग होतो.

ऋतुमानानुसार ताजी फळे, ताज्या भाज्या यांचा वापर सॅलड, कोशिंबीर, सूप यांमध्ये करावा.

बाहेरील खाद्यपदार्थ टाळावेत. तरी खायची वेळ आल्यास मसालेदार, तळलेले व रासायनिक पदार्थ घातलेले टाळावे.

आहारात अतिमीठ असलेले पदार्थ, खारावलेले पदार्थ, वेफर्स, चिप्स तसेच चॉकलेट, चायनीज पदार्थ यांचे प्रमाण टाळावे.

थोडय़ा-थोडय़ा वेळाने हलका आहार घ्यावा.

सर्व न्यूट्रियंट्स असलेला परिपूर्ण आहार घ्यावा.

जेवताना टी.व्ही.समोर बसून खाऊ नये. त्यामुळे आपण किती प्रमाणात काय जेवत आहोत याचे भान राहत नाही.

जेवताना आजूबाजूचे वातावरण आनंदी व प्रसन्न राहणे गरजेचे आहे.

gkashelkar@gmail.com