19 September 2020

News Flash

दिल्लीत जमिनदाराच्या मुलाकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

दिल्लीतील मुनिरका भागात शनिवारी जमिनदाराच्या मुलाने एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

| February 8, 2014 03:30 am

दिल्लीतील मुनिरका भागात शनिवारी जमिनदाराच्या मुलाने एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विकी नावाच्या या आरोपीला अटक झाली असून, दिल्लीतील वसंत विहार पोलीस ठाण्यात बालकांसाठीच्या लैंगिक गुन्हे प्रतिबंधक कायद्यातंर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील पिडीत मुलगी शुक्रवारी रात्री खरेदीसाठी बाहेर पडली असता घराजवळच असणा-या रूग्णालयाच्या परिसरातील एका खोलीत नेऊन आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर घटनेनंतर पिडीत तरुणीवर सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरू असून, तिचे वैद्यकीय परीक्षण करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 3:30 am

Web Title: 14 year old girl raped by landlords son in south delhi locality
टॅग India News
Next Stories
1 मोदी देशातील जनतेला मूर्ख बनवत आहेत- राहुल गांधी
2 निडो तनीमचा मृत्यू देशासाठी लाजिरवाणी बाब
3 केजरीवालांची आता राज्यपालांशीच ‘जंग’
Just Now!
X