मृत्यू झाल्यानंतर एखादी व्यक्ती जिवंत झाल्याचं आपण आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. पण उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे अशीच एक घटना घडली असून, ग्रामस्थ रामकिशोर आपल्या मृत्यूच्या पाच तासानंतर पुन्हा जिवंत झाले. रामकिशोर यांच्या अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी करण्यात आली होती, नातेवाईकही जमले होते. पण रामकिशोर यांना उठून बसलेलं पाहिताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. डॉक्टरांनीही हा एक चमत्कार असल्याचं म्हटलं आहे.

५३ वर्षीय रामकिशोर यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कुटुंबात एकच आक्रोश सुरु झाला होता. सर्व जवळचे नातेवाईक गावात जमले होते. कुटुंबिय आणि ग्रामस्थांनी अंत्यसंस्काराची पूर्ण तयारीही केली होती.

मृतदेहाला आंघोळ घातल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नेलं जात असता रामकिशोर यांच्या शरिरात हालचाल झाल्याचं जाणवलं. उपस्थितांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनाही आश्चर्य वाटलं. इतक्यात रामकिशोर उठून बसले आणि काही चिंता करु नका मी जिवंत आहे असं सांगू लागले. चुकून मला घेऊन गेले होते, आता परत पाठवलं आहे असंही ते म्हणत होते.

काही वेळापूर्वी असलेल्या शांततेच्या ठिकाणी आनंद साजरा होऊ लागला. हा चकत्कार असल्याचं म्हणत लोक त्यांच्या घरी गर्दी करुन लागले. शेजारच्या गावकऱ्यांमध्येही बातमी पोहोचले आणि त्यानंतर हे प्रकरण प्रसिद्धीस आलं.

डॉक्टर प्रदीप बन्सल यांनी सांगितल्याप्रमाणे, हा कोणताही चमत्कार नाही. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या ह्रदयाचे ठोके आणि श्वास घेण्याची प्रक्रिया इतकी मंदावते की तो व्यक्ती कोमात जातो. अशा परिस्थितीत इतरांना त्याचा मृत्यू झाला आहे असं वाटू लागतं, पण तो जिवंत असतो.

डॉक्टर संजय भार्गव यांनी मात्र विज्ञान हे स्विकारत नसल्याचं म्हटलं आहे. ईसीजीशिवाय एखाद्या व्यक्तीला मृत घोषित केलं जाऊ शकत नाही. हे पहिलं प्रकरण नसून, याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत.