एखाद्या महिलेला भररस्त्यात ओढून लैंगिक अत्याचार करण्याच्या घटना भारत किंवा विकसनसील राष्ट्रात नित्याच्या असू शकतात पण विकसित राष्ट्रात अशी घटना घडते, तेव्हा त्याची जगभरात चर्चा होते. अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरात असाच एक प्रकार घडला आहे. १ मे रोजी न्यूयॉर्कमध्ये घडलेल्या एका घटनेची माध्यमांवर बरीच चर्चा होत असून महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रण समोर आल्यानंतर त्यावर अधिक चिंता व्यक्त केली जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

व्हायरल व्हिडीओमध्ये जे दिसलं, ते फार भयानक होतं. रात्रीच्या वेळेस फूटपथावरून एक महिला जाताना दिसत आहे. तेवढ्यात चेहरा झाकलेला एक व्यक्ती महिलेच्या मागून येऊन तिच्या गळ्यात पट्टा फेकतो आणि महिलेला खाली पाडतो. फूटपाथवर पडलेल्या महिलेला आरोपी मागे खेचत नेतो. मागे दोन गाड्या उभ्या असलेल्या दिसतात. त्या दोन गाड्यांच्या मधोमध आरोपी पीडित महिलेला खेचत नेतो.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Yogendra Yadav BJP Win NDA Congress
“मी भाजपाच्या विजयाची भविष्यवाणी…”, योगेंद्र यादव यांनी दिलं स्पष्टीकरण, पुन्हा सांगितलं किती जागा मिळणार
Hamas men confess
“माझ्या वडिलांनी आधी बलात्कार केला, मग मी आणि…”, हमासच्या बाप-लेकाचे इस्रायली महिलेशी राक्षसी कृत्य
uddhav thackeray sharad pawar narendra modi
“लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे भाजपाबरोबर जातील”, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यानंतर शरद पवार म्हणाले…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Murlidhar Mohol - Ravindra Dhangeka
Pune Accident : “दोन उद्ध्वस्त कुटुंबांचे अश्रू पुसायचे सोडून बिल्डरची बाजू घेताय?” धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांना टोला
Hammer on big hotels in Kalyaninagar and Mundhwa area
कल्याणीनगर, मुंढवा परिसरातील मोठ्या हॉटेल्सवर हातोडा, ५४ हजार ३०० चौरस फुटांचे अतिक्रमण जमीनदोस्त

या घटनेला १० दिवस उलटूनही अद्याप आरोपी हाती लागलेला नाही. सदर पीडित महिला ४५ वर्षांची असल्याचे कळते. आरोपीने चेहरा झाकलेला असल्यामुळे त्याची ओळख पटविण्यात अडचण येत असल्याचे सांगितले जाते. त्या दोन गाड्यांच्या मधोमध पीडित महिलेले ओढल्यानंतर आरोपीने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे कृत्य केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

पीडित महिला या घटनेनंतर मानसिक धक्क्यात आहे. तिच्यावर एनवायसी हेल्थ अँड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते.

अलिबागमध्ये घडलेल्या घटनेतील आरोपींना जन्मठेप

न्यूयॉर्कमध्ये घडलेल्या घटनेसारखीच एक घटना महाराष्ट्राच्या अलिबागमध्ये २०२० साली घडली होती. अलिबागच्या तळाशेत वडवली मार्गावरील एका टेकडीवर आपल्या मुलीकडे जात असलेल्या महिलेला दोन आरोपींनी झुडी झुडपात ओढत नेले. तिथे तिला जबरदस्ती मद्य प्राशन करण्यास भाग पाडले आणि नंतर दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. जवळच राहणाऱ्या नातेवाईकांनी हा प्रकार पाहून तिथे येऊन आरोपींना हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी त्यांच्यावरच दगडफेक केली.

सुरेश लहानु नाईक, विशाल कृष्णा म्हात्रे अशी आरोपींची नावे आहेत. पोयनाड पोलीस ठाण्यात दोघांवर भादवी, कलम ३७६(ड), ३३६, ३२८, ३६ सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१)(डब्ल्यू) (आय) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अलिबागच्या तत्कालीन पोलीस उप अधिक्षक अधिकारी सोनाली कदम यांनी या प्रकरणाच्या तपास करून आरोपींविरोधात अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. दि. ८ मे रोजी अलिबाग सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.