नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (एनएसई) अध्यक्ष अशोक चावला यांनी शुक्रवारी रात्री अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याआधी काही वेळापूर्वीच केंद्र सरकारला सीबीआयमार्फत एअरसेल-मॅक्सिस प्रकरणामध्ये चावला यांच्याविरोधात खटला भरण्याला परवानगी मिळाली होती. या महत्वपूर्ण घडामोडीनंतर लगेचच चावला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

मात्र, एनएसईकडून शुक्रवारी रात्री चावला यांच्या राजीनाम्याबाबत घोषणा करताना कोणतीही विशेष माहिती देण्यात आली नव्हती. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सेबी) एनएसईमधील को-लोकेशन सुविधेतील तृटींवर काम करीत आहे. काही दलालांना एक्सचेंद्वारे तीव्र फ्रिक्वेन्सीच्या सुविधेत अस्विकारार्ह सेवा उपलब्ध करुन दिली आहे किंवा नाही याचाही सेबी शोध घेत आहे.

माजी वित्त सचिव असलेले चावला हे २८ मार्च २०१६ रोजी एनएसईचे अध्यक्ष बनले. त्यांनी भारतीय नागरविकास विमान सचिवही म्हणूनही काम पाहिले आहे. चावला यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये येस बँकेच्या अध्यक्षपदावरुन राजीनामा दिला होता. यापूर्वी सीबीआयने दिल्लीच्या एका कोर्टात सांगितले होते की, केंद्राने पाच लोकांविरोधात खटला भरण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये विद्यमान आणि काही माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहेत. हे लोक काँग्रेस आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांच्याशी संबंधित एअरसेल-मॅक्सिस प्रकरणातील आरोपी आहेत.