23 September 2020

News Flash

भविष्यवाणी! येडियुरप्पा ५ मार्चपर्यंत होणार मुख्यमंत्री

भाजपा प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा येत्या महिन्याभरात कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील असा दावा दोन ज्योतिषांनी केला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा येत्या महिन्याभरात कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील असा दावा दोन ज्योतिषांनी केला आहे. विद्वान गणेश हेगडे आणि पवन जोशी अशी या दोघांची नावे आहेत. आपण येडियुरप्पा यांच्या जन्मकुंडलीचा अभ्यास केला असून पाच मार्चपर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री बनतील असे या दोन ज्योतिषांनी म्हटले आहे. असे घडले नाही तर आपण ज्योतिष सांगणे बंद करु असे या दोघांनी सांगितले आहे.

यापूर्वी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. काँग्रेस आणि जेडीएस आघाडी सरकार स्थापन करतील ही आपली भविष्यवाणी खरी ठरली. २००८ मध्ये आपण येडियुरप्पा सरकार स्थापन करतील असे म्हटले होते आणि घडले सुद्धा तसेच असे हेगडे यांनी सांगितले. जन्मकुंडलीची सध्याची स्थिती त्यांचे ग्रह अनुकूल असल्याचे दाखवते.

पण मुख्यमंत्री म्हणून ऑक्टोंबरपर्यंतचा त्यांचा कार्यकाळ खडतर असेल. एच.डी.कुमारस्वामी यांच्या ग्रहांची स्थिती खूपच खराब आहे. त्यांनी किती होम हवन केले तरी त्यांना सत्ता गमवावी लागेल असे हेगडे यांनी म्हटले आहे. मार्चनंतर नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणखी वाढेल तसेच भाजपा लोकसभेत २८५ पेक्षा जास्त जागा जिंकेल असा या दोघा ज्योतिषांचा दावा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 4:24 pm

Web Title: astrologers predict yeddyurappa will become karnataka chief minister
Next Stories
1 Video : साध्वीने दिली स्वतःच्याच शिष्याच्या हत्येची सुपारी !
2 अर्थव्यवस्था सावरण्यासाठी पाकिस्तान आता गाढवांची मदत घेणार
3 ‘कधीही लाच घेऊ नकोस’,….जेव्हा मोदींच्या आईने मागितलं होतं आश्वासन
Just Now!
X