‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम सध्या घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अभिनेत्री शिवाली परबला सुद्धा या कार्यक्रमामुळे एक नवीन ओळख मिळाली. आज अभिनेत्री तिचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. परंतु, यंदाचा वाढदिवस तिच्यासाठी नेहमीपेक्षा खास ठरला आहे कारण, आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शिवालीने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.

शिवाली परबने काही दिवसांपूर्वी नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी एका मुलाखतीत दिली होती. आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तिने या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. गृहप्रवेशाचा पहिला फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यामध्ये हिरव्या रंगाची साडी नेसून अभिनेत्री पूजेला बसल्याचं पाहायला मिळत आहे.

shivali parab reaction on affair rumors with nimish kulkarni
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाली, “निमिष आणि माझ्या आई-वडिलांची भेट…”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
maharashtrachi hasya jatra fame shivali parab bought new house
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबने घेतलं नवीन घर, पुढच्या महिन्यात होणार पूजा; म्हणाली, “ही गोष्ट अजून…”
bhushan kadu reveals why he left maharashtrachi hasya jatra
“हास्यजत्रेतून मनाविरुद्ध एक्झिट घेतली”, भूषण कडूने सांगितला खडतर प्रसंग; म्हणाला, “गोस्वामी सरांना…”
unique wedding card Marriage Card viral on social media
अरे बापरे! लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे; लग्नाला जायचं की नाही? VIRAL लग्नपत्रिका पाहून पोट धरुन हसाल
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?

हेही वाचा : “अवॉर्ड्स विकले जातात का?” सिद्धार्थ चांदेकरने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला, “मला सत्य परिस्थिती…”

शिवाली काही दिवसांपूर्वी ‘मीडिया टॉल्क मराठी’च्या मुलाखतीत १० तारखेला मी नव्या घरात गृहप्रवेश करणार असं म्हणाली होती. “हे सगळं फक्त प्रेक्षकांमुळे शक्य झालंय. त्यामुळे हा वाढदिवस माझ्यासाठी खरंच खूप जास्त स्पेशल असणार आहे.” असं देखील अभिनेत्रीने सांगितलं होतं.

हेही वाचा : “पप्पा, तुम्ही एवढी वर्षे…”, वडिलांच्या वाढदिवशी शिवानी रांगोळेची खास पोस्ट; मास्तरीणबाई म्हणाल्या…

आता शिवाली तिच्या नव्या घराची पहिली झलक प्रेक्षकांना केव्हा दाखवणार याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अनेक कलाकारांनी नवीन गाड्या व नवीन घर घेतल्याचं पाहायला मिळालं. आता या यादीत शिवालीचं नाव जोडलं गेलं आहे. @_youreflectioncanbeseen या इन्स्टाग्राम पेजवरून शिवालीच्या घरातील पूजेचा पहिला फोटो शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम ज्ञानदा रामतीर्थकरने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दिलं चाहत्यांना सरप्राइज, काय ते? पाहा…

एकीकडे वाढदिवसानिमित्त तर, दुसरीकडे तिने घेतलेल्या या हक्काच्या नवीन घरामुळे सध्या शिवालीवर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. एवढ्या कमी वयात स्वत:चं घर घेतल्यामुळे तिचं विशेष कौतुक केलं जात आहे.

shivali parab new house
शिवाली परबचं नवीन घर

दरम्यान, शिवालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘हार्टबीट वाढणार हाय’ या गाण्यात शिवालीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळात आहे. या गाण्याला अभिनेत्रीचे चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.