26 November 2020

News Flash

Coronavirus update : देशात २४ तासांत ४६ हजार रुग्णांची वाढ

देशातील मृतांची संख्या १ लाख ३२ हजारांच्या पुढे

प्रातिनिधीक छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

देशात पुन्हा एकदा करोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस आकडेवारीत वाढ होत असून, गेल्या २४ तासांत देशात ४६ हजारांहून अधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी आलेल्या आकडेवारीच्या तुलनेत एक हजार रुग्ण अधिक आढळून आले आहेत. नवीन रुग्णांची भर पडल्याने देशातील एकूण रुग्णसंख्याही वाढली आहे.

गेल्या २४ तासांत देशात ४६ हजार २३२ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णवाढ झाल्याने देशातील एकूण रुग्णसंख्या ९० लाख ५० हजार ५९८ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर देशात २४ तासांत ५६४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील एकूण करोना मृतांची संख्या १ लाख ३२ हजार ७२६ इतकी झाली आहे. सध्या देशात ४ लाख ३९ हजार ७४७ रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनाचा रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत देशात ८४ लाख ७८ हजार १२४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. तर गेल्या २४ तासांत ४९ हजार ७१५ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासांत १० लाख ६६ हजार २२ चाचण्या करण्यात आल्या.

रेमेडिसिविर उपचार औषधांच्या यादीतून वगळलं

शुक्रवारी करोनासंदर्भात आणखी एक महत्त्वाची घटना घडली. करोनाच्या सुरूवातीच्या काळात रुग्णांवर वापरण्यात रेमेडिसिविर हे औषध जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्युएचओनं औषधांच्या यादीतून वगळलं आहे. करोनाची बाधा झाल्यानंतर रेमेडिसविर हे औषध सर्रास देण्यात येत होतं. मात्र आता हे औषधांच्या यादीतून WHO ने बाद ठरवलं आहे. हे औषध करोना बरं होण्यासाठी गुणकारी ठरतं यासंबंधीचा कोणताही पुरावा नाही असंही WHO ने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 10:39 am

Web Title: coronavirus update india covid 19 tally crosses 90 5 lakh bmh 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 काँग्रेसचा कोणी माय-बाप शिल्लक नाही, मत कोणालाही द्या सरकार भाजपाचंचं बनतं : केजरीवाल
2 Coronavirus : एअर इंडियाच्या विमानांवर हाँगकाँगने पाचव्यांदा घातली बंदी
3 कुणाल कामराचं आणखी एक ट्विट वादात; अवमानना खटला चालवण्यास परवानगी
Just Now!
X