News Flash

निर्भया प्रकरण : चारही दोषींना होणार एकत्रच फाशी!

सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करण्यासाठी दोषींना सात दिवसांची मुदत

निर्भया प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी करणाऱ्या केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणी केली. ज्यामध्ये चारही दोषींना स्वतंत्र फाशी देता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत दोषींनी सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करून पाहता येणार आहे.

निर्भया प्रकरणातील दोषींचे डेथ वॉरंट या अगोदर दोनवेळा टळले आहे. दोषींकडून विविध कायदेशीर मार्गांचा सातात्याने वापर करून डेथ वॉरंट टाळले जात आहे. मात्र आता उच्च न्यायालयाकडून दोषींना सर्व कायदेशीर मार्गांचा वापर करण्यासाठी आठवडाभराची मुदत देण्यात आलेली आहे. आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने फाशीसाठी होणाऱ्या विलंबाबद्दल प्रशासनावर देखील ताशेरे ओढले आहेत.

न्यायालयाने म्हटले की, कनिष्ठ न्यायालयात सर्वांना एकत्रच दोषी ठरवण्यात आले होते. दोषींचा गुन्हा अत्यंत अमानुषतेचा आहे. याचा समाजावर विचित्र परिणाम झाला आहे. मात्र, घटनेनुसार त्यांच्यासाठी देखील काही कायदेशीर बाबी आहेत, त्यामुळे त्यांना बराच कालावधी मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 4:12 pm

Web Title: delhi high court dismisses centres plea challenging trial court order which had stayed the execution of all 4 convicts msr 87
Next Stories
1 दिल्लीत पराभवाच्या भीतीपोटी राम मंदिर ट्रस्टची घोषणा; ओवेसींची भाजपावर टीका
2 NRC पाठोपाठ मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाचं राज ठाकरेंकडून ‘मनसे’ स्वागत
3 डॉक्टर पत्नीच नवऱ्याला पॉर्न व्हिडीओ पाहायला भाग पाडायची आणि तिच्याच मोबाइलमध्ये….
Just Now!
X