01 March 2021

News Flash

फेसबुक आणि ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई

ट्रम्प समर्थकांचा अमेरिकेत हिंसाचार

संग्रहित (Reuters)

अमेरिकेत अभुतपूर्व सत्तासंघर्ष पाहण्यास मिळत असून डोनाल्ड ट्रम्प पराभव मानण्यास नकार देत असतानाच त्यांच्या समर्थकांकडून हिंसाचार करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून तोडफोड केली. जो बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच हा सर्व प्रकार घडला. या सर्व हिंसाचारानंतर फेसबुक आणि ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

अमेरिकेत अभुतपूर्व सत्तासंघर्ष, ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार; संसदेत घुसून तोडफोड

ट्विटर आणि फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट तात्पुरत्या स्वरुपासाठी ब्लॉक केलं आहे. हिंसाचार सुरु असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडीबाबात केलेल्या निराधार आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांना नियमांचं उल्लंघन करणारे तीन ट्विट काढून टाकण्यास सांगितलं आहे. ट्विटरने १२ तासांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट ब्लॉक केलं असून जोपर्यंत ट्विट हटवणार नाही तोपर्यंत अकाऊंट बंद राहील असं स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ डोनाल्ड ट्रम्प आपल्या @realDonaldTrump या ट्विटर अकाऊंटवरुन एकही ट्विट करु शकणार नाहीत.

फेसबुकनेही नियमांचं उल्लंघन केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचं पेज २४ तासांसाठी ब्लॉक करत असल्याचं सांगितलं आहे. तसंच इन्स्टाग्रामनेही २४ तासांसाठी अकाऊंट लॉक केलं आहे.

We are locking President Donald Trump’s Instagram account for 24 hours as well: Adam Mosseri, Head of Instagram pic.twitter.com/3TSosVgfS7

ट्रम्प यांच्याकडून शांततेचं आवाहन
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं असून हिंसाचार करु नका असं सांगितलं आहे. आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग आहोत असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 8:22 am

Web Title: facebook twitter block donald trump account after us capitol attack sgy 87
Next Stories
1 २२ लाखांचे TV, ११ लाखांच्या चादरी अन् बरंच काही; मुख्यमंत्री असताना मुफ्तींनी ६ महिन्यात केला ८२ लाखांचा खर्च
2 अमेरिकेत अभूतपूर्व सत्तासंघर्ष, ट्रम्प समर्थकांकडून हिंसाचार; संसदेत घुसून तोडफोड
3 देवतांच्या नावे यंत्र विक्रीच्या जाहिरातीवर बंदी घालण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
Just Now!
X