गुजरातच्या सुरत शहरातील रघुवीर मार्केटमधील एका दहा मजली इमारतीला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी ४० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असले तरी जीवितहानीचे कोणतेही वृत्त नाही.

सुरत हे देशातील प्रसिद्ध व्यापारी शहर आहे. याठिकाणी कपड्यांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. अशाच तयार कपड्यांची दुकानं असलेल्या रघुवीर मार्केटमधील एका दहा मजली इमारतीला मंगळवारी भीषण आग लागली. यामध्ये अनेक कपड्यांची दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचे कळते. आगीची वर्दी मिळताच ४० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत दिल्ली शहरात अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगींमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि जीवितहानी झाली आहे.