वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुन्हा अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातून आज, मंगळवारी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे नासाचे अनुभवी अंतराळवीर अंतराळात जाणार आहेत. विल्यम्स या तिसऱ्यांदा अंतराळात प्रवास करणार आहेत.

हेही वाचा >>> प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी सकाळी ८.०४ वाजता फ्लोरिडातील केप कॅनाव्हरलच्या स्पेस लॉन्च कॉम्प्लेक्स-४१ वरून अॅलटस व्ही प्रक्षेपकांवर स्टारलाइनर अंतराळयान प्रक्षेपित केले जाणार असून या यानातून विल्यम्स आणि विल्मोर अंतराळात झेपावणार आहेत.स्टारलाइनर अंतराळयानावर सुनीता प्रशिक्षण घेत होत्या. यानाच्या विकासातील अडथळ्यांमुळे मोहीम प्रलंबित होती. जुलै २०२२मध्ये स्टारलाइनर या नव्या यानातून अंतराळवीर अवकाशात जाणार होते, मात्र करोनामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती.विल्यम्स यांच्या आधीच्या मोहिमा डॉ. दीपक पांड्या आणि बोनी पांड्या यांच्या पोटी जन्मलेल्या सुनीता विल्यम्स यांची निवड १९९८ मध्ये नासामध्ये झाली. २००६ आणि २०१२ मध्ये त्यांनी अंतराळात प्रवास केला होता. या दोनही मोहिमांमध्ये एकूण ३२२ दिवस त्यांनी अंतराळात घालवले होते. हा विक्रम मानला जात आहे.