अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या जोरदार हिमवर्षावामुळे झालेल्या हिमस्खलनात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतात एकाच गावातील ५० लोकांचा समावेश आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून हिमवर्षाव होत असल्यामुळे हिमस्खलन झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य आणि पुर्वोत्तर भागातील शेकडो घरे यामुळे उद्धवस्त झाली आहेत. रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बचावपथकाला दुर्घटनाग्रस्त गावांपर्यंत पोहोचण्यास अडचणी येत आहेत. सर्वात जास्त फटका नुरिस्तान प्रांतातील गावांना बसला असून येथे एकाच गावातील ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे नैसर्गिक आपत्ती मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद उमर मोहम्मदी म्हणाले.

हिमस्खलनामुळे बार्गमटल जिल्ह्यातील दोन गावे पूर्णपणे नष्ट झाले आहेत. एका गावातून ५० मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तर दुसऱ्या गावात पोहोचण्याचा बचाव दलाकडून प्रयत्न सुरू आहे.