27 February 2021

News Flash

IIMA च्या विद्यार्थिनीचा हॉस्टेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह, कॅम्पसमध्ये खळबळ; आत्महत्येचा संशय

आत्महत्या केल्याची शक्यता, पण मृतदेहाजवळ नाही सापडली कोणतीही सुसाइड नोट

(आत्महत्या केलेल्या तरुणीचा व्हायरल झालेला फोटो )

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबादमध्ये (IIMA) शिकणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या हॉस्टेलच्या रुममध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी तरुणीचा मृतदेह आढळला असून तिने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण मृतदेहाजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रिष्टी राज (Drishti Raj )असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. ती हॉस्टेलच्या रुममध्ये एकटीच राहायची. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास तिच्या मैत्रिणी रुमचा दरवाजा ठोठावत होत्या पण बराच वेळ आतून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने मैत्रिणींनी हॉस्टेल प्रशासनाला कळवलं, नंतर हॉस्टेलच्या गार्ड्सनी तिच्या रुमचा दरवाजा तोडला. तेव्हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत द्रिष्टीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.

आणखी वाचा- धक्कादायक! मोबाइलसाठी मुलाने मागितले १० हजार रुपये, आईने नकार देताच उचललं टोकाचं पाऊल

दरम्यान, मृतदेहाजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याने तिच्या मैत्रिणींकडे विचारपूस केली जात आहे. तिचा फोन पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याचा तपास केला जात आहे. शिवाय तिचे WhatsApp चॅट देखील तपासले जाणार आहेत. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून सध्या याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याने इतर अँगल्सनीही या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी नमूद केलंय. तर, आयआयएमएने विद्यार्थिनीच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 2:48 pm

Web Title: iima student found dead inside hostel room suicide suspected sas 89
Next Stories
1 …म्हणून संसदेच्या गेट क्रमांक एक जवळचा गांधींजींचा पुतळा हटवण्यात आला
2 बायडेन यांचा ‘हा’ निर्णय लाखो भारतीयांचं स्वप्न करणार पूर्ण
3 ‘हम तेजस्वी यादव बोल रहे हैं, DM साहब’, बिहारमधील ‘हा’ फोन कॉल होतोय व्हायरल
Just Now!
X