News Flash

कॉपीला अटकाव : प्राध्यापकास मारहाण

शालान्त परीक्षेतील सामूहिक कॉपीस रोखल्याबद्दल शिक्षकांना मारहाण होण्याचे बिहारमधील प्रकरण गाजत असतानाच परीक्षेत कॉपीसारखेच गैरप्रकार रोखणाऱ्या प्राध्यापकास येथील विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचे उघड झाले आहे.

| March 22, 2015 04:20 am

शालान्त परीक्षेतील सामूहिक कॉपीस रोखल्याबद्दल शिक्षकांना मारहाण होण्याचे बिहारमधील प्रकरण गाजत असतानाच परीक्षेत कॉपीसारखेच गैरप्रकार रोखणाऱ्या प्राध्यापकास येथील विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचे उघड झाले आहे.
बिपीन बिहारी महाविद्यालयातील राहुल यादव हा बीएस्सीत शिकणारा विद्यार्थी परीक्षेत कॉपी करीत असताना प्राध्यापकांनी त्याला रोखले असताना राहुल आणि त्याच्या मित्रांनी त्यांना मारहाण केली. १७ मार्च रोजी ही घटना घडली. राहुल हा विद्यार्थी संघटनेचा नेता असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल याला अटक करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.एम. पांडेय यांनी ही माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 4:20 am

Web Title: jhansi college teacher beaten up for objecting to copying
Next Stories
1 लखनौ-वाराणशी मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू
2 दहशतवाद्यांचे मनोधैर्य खचल्याचा परिणाम – पर्रिकर
3 अमित शहा यांची आज वाराणशीत जाहीर सभा
Just Now!
X