मध्य प्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच निवडणुकीच्या प्राचाराच्या नादात करोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याची माहिती समोर येत आहे. इंदूरमधील सांवेर मतदारसंघामध्ये करोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आलं. सात सप्टेंबरपासून येथे वेगवेगळ्या भागांमधून भाजपा नेत्यांच्या समर्थनार्थ कलश यात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे इंदूरमध्ये करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत असूनही नियमांचे उल्लंघन करुन राजकीय नेत्यांचे समर्थक मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहेत. करोनासंदर्भातील नियमांचेही या यात्रांमध्ये पालन केलं जात नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन केले जात नसल्याचे चित्र या यात्रांदरम्यान दिसत आहे. तसेच यात्रांमध्ये सहभागी झालेले समर्थक मास्क घालत नाहीय. याच संदर्भात आता पोलिसांनी कारवाई केली आहे.

सोशल मिडीयावरही या कलश यात्रेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये माजी आमदार आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनकर यांच्यासहीतर सहा जणांविरोधात तीन वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा दाखल केल्याचे वृत्तआहे. मंगळवारी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनंतर बुधवारी सांवेरमधील रालामंडल, झलारिया, निगनोटी, बूढी बरलाई, पीर कराडियासहीत १५ वेगवेगळ्या ठिकाणी कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. नर्मदा कलश यात्रेच्या नावाखाली या यात्रांचे आयोजन करण्यात येत असून भाजपाच्या नेत्यांनी प्रचाराच्या हेतूने हे आयोजन केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.एएनआय़ या वृत्तसंस्थेनेही यासंदर्भातील व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. या कलश यात्रा राज्या मंत्री असणाऱ्या तुलसी सिलवाट यांच्या समर्थनार्थ काढण्यात आल्याचे एएनआयने म्हटलं आहे.

iran women hijab
हिजाब न घातल्याने महिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, इराणमध्ये नक्की काय घडत आहे?
sensex again at the level of 74 thousand print eco news
तेजीवाल्यांची पकड मजबूत; सेन्सेक्स पुन्हा ७४ हजारांच्या उंबरठ्यावर
mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….

या कलश यात्रांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये शेकडोच्या संख्येने नागरिक एकत्र आल्याचे दिसत आहे. हे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर इंदूरचे पोलीस उपनिरिक्षक हरिनारायण चारी मिश्री यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं आहे. पोलीस उपनिरिक्षकांनी आदेश दिल्यानंतर इंदूरमधील सांवेर, धरमपुरी आणि चंद्रावती गंज पोलीस स्थानकांमध्ये सहा लोकांविरोधात कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपाच्या विरोधकांनी या प्रकरणामध्ये दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.