15 December 2017

News Flash

हिमाचल प्रदेश: मंडीत भूस्खलन, सहा जण ठार

शनिवारी झालेल्या भूस्खलनात अनेक लोक जमिनीखाली गाडले गेले होते

नवी दिल्ली | Updated: August 13, 2017 10:57 AM

हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे शनिवारी झालेल्या भूस्खलनात अनेक लोक जमिनीखाली गाडले गेले होते.

हिमाचल प्रदेशमधील मंडीमध्ये भूस्खलनामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. शनिवारी झालेल्या भूस्खलनातील मृतांची संख्या सहा इतकी झाली असून पाच जण जखमी झाले आहेत.

हिमाचल प्रदेशमधील मंडी येथे शनिवारी झालेल्या भूस्खलनात अनेक लोक जमिनीखाली गाडले गेले होते. यातील चार जणांना वाचवण्यात आले होते. जखमींवर उपचारासाठी त्यांना जवळच्याच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंडीचे उपायुक्त संदीप कदम यांनी दोन जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. भूस्खलनामुळे तीन वाहन फसले असून एक बस महामार्गावरून ८०० मीटर इतकी वाहून गेली आहे. चार लोकांना भूस्खलनातून वाचवल्याचे त्यांनी सांगितले.

मुसळधार पावसामुळे मदत अभियान राबवण्यात पोलीस आणि बचाव पथकाला अडचणी येत आहेत.

First Published on August 13, 2017 10:49 am

Web Title: mandi hp landslide death toll rises to six