News Flash

आता अण्वस्त्र परीक्षण नाही, किम जोंग यांची घोषणा; ट्रम्प म्हटले ही जगासाठी गुड न्यूज!

वारंवार अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी देणारे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असे म्हटले आहे.

वारंवार अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी देणारे उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण करणार नाही असे म्हटले आहे. शनिवारपासून म्हणजे आजपासूनच हे परीक्षण थांबवण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे. हुकुमशहा किंग जोंग उन यांनी घेतलेला हा मोठा निर्णय म्हणजे जगासाठी गुड न्युज आहे असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

उत्तर कोरियाचे हुकुमशहा यांनी फक्त अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणस्त्रांचे परीक्षण थांबवण्याचाच निर्णय घेतलेला नाही तर त्याचे केंद्रीही बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. नॉर्थ कोरियाने जाहीर केलेला हा निर्णय खरोखरच स्वागतार्ह आहे असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांनी याआधी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि आण्विक हल्ल्याची धमकी दिल्याने अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव वाढला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून किम जोंग यांनी नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही देशांमध्ये तर परस्परांविरोधात युद्ध करण्याचीही घोषणा झाली होती. मात्र तसे काही घडलेले नाही, उलट किम जोंग यांनी आपला निर्णय बदलत यापुढे अण्वस्त्र आणि बॅलेस्टिक क्षेपणस्त्रांचे परीक्षण करणार नाही असे म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन यांची भेट मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र या भेटीआधीच किम जोंग उन यांनी दोन पावले मागे येत आण्विक परीक्षण बंद करण्याची घोषणा केली आहे. दक्षिण कोरियाचे आर्थिक स्थिती बिकट आहे त्यातून सावरण्यासाठी किम जोंग उन यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरु झाली आहे.

किम जोंग उन यांनी जेव्हा ही घोषणा केली त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून नॉर्थ कोरिया आणि जगासाठी ही गुडन्यूज असल्याचे म्हटले आहे. तसेच किम जोंग उन यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीतल्या चर्चेसाठी मी उत्सुक आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 8:40 am

Web Title: north korea says will stop nuclear ballistic missile tests from april 21
Next Stories
1 कुख्यात डॉन अबू सालेमला लागले लग्नाचे डोहाळे, मागितली ४५ दिवसांची सुट्टी
2 धक्कादायक! जन्मदात्या आईनेच केली ८ महिन्यांच्या बाळाची हत्या?
3 पेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका
Just Now!
X